Headlines

हिंगोलीच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली संवेदना:मृतांच्या वारसांना शिवसेनेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा




हिंगोली येथील फटका गोदामातील आगीच्या घटनेची आमदार संतोष बांगर यांनी सविस्तर माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवेदना व्यक्त करून शिवसेनेतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणी बुधवारी ता. ७ परभणी येथे केली आहे. पुढील दोन दिवसांत हि मदत त्यांच्या वारसांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. हिंगोली येथील कपडागल्ली भागात फटाकाच्या गोदामाला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला तर १० जण भाजल्या गेले आहेत. यामध्ये दोन घरे खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आमदार संतोष बांगर, युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, नागरीक व अग्मीशमनदलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी जिल्हयाच्या दौऱ्यावर होते. यावेळ आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. या घटनेमध्ये तिघांना प्राण गमवावे लागल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय घटनेचे छायाचित्रीकरण देखील त्यांना दाखविले. आगीत मृत्यू झालेल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही त्यांच्या समोर मांडली. हिंगोलीतील घडलेल्या आगीच्या घटनेचे छायाचित्रीकरण पाहून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संवेदना व्यक्त केल्या. या प्रकरणात शासनकडून आवश्‍यक ते सहकार्य होईलच या कुटुंबाला आता आर्थिक मदतीची गरज अल्याने शिवसेनेकडून मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची जाहिर केली आहे. पुढील दोन दिवसांत हि मदत मयतांच्या वारसांना दिली जाणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *