Headlines

जेएसडब्ल्यू अतिरिक्त 40 एकर निवासी जमीन घेणार:कंपनीजवळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची घरे; बिडकीनमध्ये ‘वॉक-टू-वर्क’ची पायाभरणी



छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन औद्योगिक वसाहतीत (डीएमआयसी) औद्योगिक आणि गुंतवणुकीच्या हालचालींनी मोठा वेग घेतला आहे. बिडकीन क्षेत्रातील बहुतांश औद्योगिक भूखंडांची विक्री पूर्ण झाली असून अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या प्रकल्पांचे बांधकाम वेगाने सुरू के

.

‘महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक दर्जाची वाहन उत्पादक कंपनी टोयोटानेही बिडकीन क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी ४० एकर जमिनीची मागणी केल्याचे कळते. दुसऱ्या बाजूला, जेएसडब्ल्यू मोटर्सला त्यांच्या बिडकीन येथील मुख्य प्लांटला लागूनच ६० एकर निवासी भूखंड आधीच मंजूर करण्यात आला आहे. एमआयटीएल प्रशासनाकडून निवासी वापरासाठी दिलेली ही पहिलीच मोठी भूखंड मंजुरी ठरली आहे.

याव्यतिरिक्त, जेएसडब्ल्यू मोटर्सने याच जागेला लागून आणखी ४० एकर अतिरिक्त जमिनीची मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या गृहनिर्माणाची गरज पूर्ण करण्यासाठी मोठे उद्योग निवासी भूखंड घेत असल्याची माहिती ‘डीएमआयसी’च्या सूत्रांनी दिली. सध्या एमआयटीएल प्रशासनाकडून जमिनीच्या वाटपाबाबत तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

संकल्पनेचे प्रमुख फायदे…

प्रवासाचा तासनतास वेळ आणि पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचतो, रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे शहरातील ट्रॅफिक आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होते, आयटी पार्क आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये (उदा. पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये) ही संकल्पना वेगाने लोकप्रिय होत आहे, जिथे कंपन्यांजवळच राहण्याची सोय केली जाते. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरावर, वाहतुकीवर अतिरिक्त ताण होणार नाही.

जमिनीचा प्रकार………, दर औद्योगिक………… : ४००० प्रति चौ.मी व्यावसायिक…………: ६००० प्रति चौ.मी. निवासी……………… : ९६०० प्रति चौ.मी

बिडकीनचा कायापालट

बिडकीनमध्ये केवळ कारखानेच नव्हे, तर ‘वॉक-टू-वर्क’ या संकल्पनेवर आधारित सर्व सोयी-सुविधांनी युक्त टाऊनशिप विकसित करण्यावर एमआयटीएलचा भर आहे. औद्योगिक टप्प्यानंतर आता मोठ्या कंपन्यांनी निवासी प्रकल्पांमध्ये स्वारस्य दाखवल्याने बिडकीन परिसराचा रिअल इस्टेट व पायाभूत सुविधांच्या दृष्टीने कायापालट होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *