Headlines

वाङमय मंडळ म्हणजे मानवी संवेदना, विचार आणि संस्कृतीचे खरे प्रतिबिंब:मानूर महाविद्यालयात ‘वाङमय मंडळ’ उद्घाटनाप्रसंगी डॉ. चांदवडकर यांचे प्रतिपादन‎



साहित्य किंवा वाङमय म्हणजे केवळ पुस्तकात छापलेले शब्द नसतात, तर ते मानवी संवेदना, विचार आणि संस्कृतीचे खरे प्रतिबिंब असतात. आजच्या डिजिटल आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय जपून स्वतःची वैचारिक समृद्धी साधली पाहिजे. वाङमय मंडळाच

.

आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मानूर येथे ‘अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष’ आणि ‘वाङमय मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या वाङमय मंडळाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी चांदवड़कर बोलत होते.

​कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. जी. जाधव होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वाङमय मंडळाच्या सर्व उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवून स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. सी. डंबाळे यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. एन. एच. देशमुख यांनी करून दिला. प्रास्ताविक करून आभार प्रा. एस. जी. बागूल यांनी मानले. या सोहळ्यास महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. एस. एल. पवार, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *