![]()
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या गोव्यातील आकस्मिक निधनानंतर आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता गोवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, मृत्यूमागील नेमक्या कारणांचा सविस्तर तपास सुरू केला आहे. BNSS कलम १९४ अंतर्गत नोंद गोवा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अन्वये अनैसर्गिक मृत्यूची कायदेशीर नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पावला येथील ‘ओशन पार्क’ निवासस्थानातून थेट मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर पोलिसांनी ही कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार या तपासाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून पोलीस आता नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांचे आणि जवळच्या व्यक्तींचे जबाब नोंदवणार आहेत. निधनापूर्वी त्यांची प्रकृती नेमकी कशी होती, त्यांना काही वेगळा त्रास जाणवत होता का आणि मृत्यूपूर्वीचा घटनाक्रम कसा होता, याची सविस्तर माहिती या जबाबांमधून मिळवली जाईल. हृदयाच्या आजारावरील औषधोपचार मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यात यश आले नाही. नाना पाटेकर हे हृदयाशी संबंधित आजारांवर अगोदरपासूनच औषधोपचार घेत असल्याची माहितीही समोर आली आहे. पुढील दिशा शवविच्छेदन अहवालावर अवलंबून मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. पोलिसांच्या मते, जर शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालातून मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे स्पष्ट झाले, तर हे प्रकरण कायदेशीररित्या बंद केले जाईल. मात्र, तपासात काही संशयास्पद धागेदोरे मिळाल्यास पुढील कारवाई केली जाईल. सध्या सर्वांचे लक्ष या तपास अहवालाकडे लागून राहिले आहे. ‘माझा एक जवळचा मित्र हरपला’ – मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाना पाटेकर यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “मला खूप दुःख होत आहे की नानांचे गोव्यात निधन झाले. नाना पाटेकर माझे चांगले मित्र होते, गोव्यात आले की ते आवर्जून माझ्या घरी यायचे. नाना भेटले की कायम शेतकऱ्यांबद्दल चर्चा करायचे. समाजातील गरीब लोकांसाठी गोव्यातही काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून गोव्यातही ते मोठे काम उभे करणार होते. आज मी माझा एक अत्यंत जवळचा मित्र गमावला आहे.” नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनानेही मोठे – फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले आहे की, “माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या प्रवासात त्यांनी दमदार अभिनयाचा पट उभा केला. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा नाना स्वतः पुढे आले. मकरंद अनासपुरे आणि त्यांनी सोबत येत ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले.” ——————— ही बातमी पण वाचा.. नटसम्राट नाना पाटेकर अनंतात विलीन, मुलाने दिला मुखाग्नी: शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली, ‘नाना साहेब अमर रहे’ ‘नाना साहेब परत या’च्या घोषणा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी सकाळी गोव्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे या त्यांच्या गावी रात्री साडेअकरा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा मल्हारने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित जनसमुदायाने ‘नाना साहेब अमर रहे’ तसेच ‘नाना साहेब परत या’ अशा घोषणा दिल्या. सविस्तर वाचा
Source link
नाना पाटेकरांच्या निधनाप्रकरणी गोवा पोलिसांचे मोठे पाऊल:अनैसर्गिक मृत्यूची नोंद करत सुरू केला तपास, कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार