पुण्यात एमपीएससी (MPSC) परीक्षा आणि नियुक्त्यांच्या मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना, 5 ऑक्टोबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर
.
“तुमचा शब्द मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला…”
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘सस्नेह जय महाराष्ट्र’ करत एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणाले, “५ ऑक्टोबर २०२६ रोजी मी जेव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली, तेव्हा मी तुमचे म्हणणे आणि तुमच्या रास्त अपेक्षा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन असे आश्वस्त केले होते. त्यानुसार आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे.”

“नोकरीसाठी राबणाऱ्या तरुणांना पाहून जिवाची कालवाकालव होते”
विद्यार्थ्यांच्या वेदना समजून घेताना राज ठाकरे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. “स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपले घर आणि कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब-राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिले की खरोखरच जिवाची कालवाकालव होते,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
लवकरच येणार चांगली बातमी, विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीबद्दल माहिती देताना ते म्हणाले, “माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असून, ते देखील या विषयावर पूर्णपणे सकारात्मक आहेत हे मला जाणवले. त्यामुळे येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात नक्कीच एक चांगली बातमी येईल, अशी मला अपेक्षा आहे.” तसेच, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांचे आंदोलन
——————
ही बातमी पण वाचा..
MPSC आंदोलनाचा नववा दिवस:प्रकृती बिघडल्याने 3 विद्यार्थ्यांनी सोडलं उपोषण, रोहित पवार म्हणाले- अध्यक्षांच्या विकेटशिवाय आंदोलनाची सांगता नाही

पुण्यात एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे गेल्या नऊ दिवसांपासून हक्कांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात काही विद्यार्थी अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत. मात्र, या उपोषणाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे उपोषणाला बसलेल्या सातपैकी तीन विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे. सविस्तर वाचा