Headlines

भंडाऱ्यात भाजप खासदार भारती पारधींच्या वाहनाची दुचाकीला धडक, दोघे गंभीर:तुमसर-रामटेक महामार्गावर अपघात, अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी घेतले ताब्यात




मध्य प्रदेशातील बालाघाट येथील भाजप खासदार भारती पारधी यांच्या भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील उसर्रा गावाजवळ झालेल्या या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे पंजाबमधील दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सुरजित सिंग आणि तसमिरा मेहरा अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. हे दोघेही पंजाबचे रहिवासी असून, सध्या भंडारा जिल्ह्यात भात कापणीच्या ‘हार्वेस्टर’ मशीनवर मजूर म्हणून कामासाठी आले होते. नक्की काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, खासदार भारती पारधी या मध्य प्रदेशातील बालाघाट येथून नागपूरच्या दिशेने प्रवास करत होत्या. तुमसर तालुक्यातील उसर्रा गावाजवळ आल्यावर त्यांच्या वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील सुरजित सिंग आणि तसमिरा मेहरा हे दोघेही खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर महामार्गावर बघ्यांची गर्दी जमल्याने काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि दोन्ही जखमी मजुरांना उपचारासाठी तातडीने भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांची कारवाई या घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद करून संबंधित अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. हे ही वृत्त वाचा

वाळूच्या ट्रॅकची स्कुटीला जोरदार धडक:हवेत उडालेल्या तरुणीने ट्रॅकचा बंपर पकडून वाचवला जीव, श्रीरामपूरमधील घटना श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवर एका भरधाव वाळूच्या ट्रकने स्कुटीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात स्कुटीवरील तरुणी थोडक्यात बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर रोडवरून विनापरवाना वाळू वाहतूक करणारा एक ट्रक वळत असताना, समोरून स्कुटीवरून येणाऱ्या तरुणीला त्याने जोराची धडक दिली. या धडकेमुळे स्कुटी ट्रकला धडकून खाली पडली आणि स्कुटीवरील तरुणी हवेत उडाली. ट्रक पूर्णपणे न थांबल्यामुळे तरुणी थेट ट्रकच्या समोरच जमिनीवर पडणार होती. मात्र, तिने प्रसंगावधान राखत अत्यंत चपळाईने ट्रकच्या बंपरला धरून स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर तिने स्वतः उठून आपली स्कुटी बाजूला उभी केली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *