![]()
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या माघारीनंतर राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र झाला असून शुक्रवारी (९ आॅक्टोबर) राज्यातील २३ प्रमुख शहरांमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले आहे. हवामान विभागानुसार विदर्भातील अमरावती येथे सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सियस या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी २८.२ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवले गेले आहे. प्रमुख शहरांचे कमाल तापमान हे नेहमीच्या सरासरीपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सियसने अधिक नोंदवले जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या या काळात शहरांचे सरासरी कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सियस असणे अपेक्षित आहे. एक्स्पर्ट व्ह्यू: ‘एल निनो’चाच परिणाम एल निनो अति तीव्र स्थितीचा हा परिणाम आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कमाल आणि किमान तापमान वाढलेलेच असेल. नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. -श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम विज्ञान केंद्र.
Source link
संभाजीनगरसह राज्यातील 23 शहरांचा पारा 35 अंश सेल्सियसपेक्षा अधिक:अति तीव्र एल निनोमुळे स्थिती