Headlines

पाहणी नको, तातडीने मदत द्या:दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना एक लाख, शेतमजुरांना 25 हजार देण्याची निलेश लंकेंची मागणी




राज्यभरात पावसाने ओढ दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची दखल घेत नुकतीच केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यानंतर खासदार निलेश लंके यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. “केवळ पाहणी करून थांबू नका, तर दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट मदत जमा करा,” अशी आग्रही भूमिका खासदार लंकेंनी घेतली आहे. “सरकारची तत्परता ठीक, पण केवळ पाहणी नको” केंद्रीय पथकाने तातडीने जिल्ह्याची पाहणी केल्याबद्दल खासदार निलेश लंके यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, केवळ दौऱ्यांवरून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, याची जाणीव त्यांनी सरकारला करून दिली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “सरकारने दुष्काळाच्या पाहणीसाठी एवढी तत्परता दाखवली, त्याबद्दल नक्कीच एक समाधान वाटतं. पण ज्या पद्धतीने आता पाहणी दौरा केला, केवळ तो दौरा करून काहीही साध्य होणार नाही. लोकांना आता तात्काळ मदत दिली गेली पाहिजे, ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे.” शेतकऱ्यांना १ लाख आणि मजुरांना २५ हजार द्या ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना खासदार लंके यांनी मदतीचा आकडाही सुचवला आहे. ते म्हणाले की, “येणाऱ्या दसऱ्याच्या आधी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात एक-एक लाख रुपये आणि शेतमजुरांना पंचवीस हजार रुपये दिले, तरच त्यांना थोड्याफार प्रमाणात आपला सण साजरा करता येईल.” राज्यात आणखी 18 तालुक्यांत प्रत्यक्ष पाहणीनंतर दुष्काळ जाहीर केला जाणार: मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात १९ टक्के पाऊस कमी झाला म्हणून सरकारने २६५ तालुक्यांमध्ये सप्टेंबर अखेर दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुष्काळी भागांतील उपाययोजनांसाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक २९ सप्टेंबर रोजी झाली होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील चर्चेनंतर आणखी १८ तालुक्यांत प्रत्यक्ष पाहणीनंतर दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. प्रमुख ५ पिकांचे २० टक्के सर्वेक्षण होणार : शासनाने दिलेल्या आदेशानुसार, ट्रिगर-१ यादीतील तालुक्यांव्यतिरिक्त परिशिष्ट-अ मध्ये समाविष्ट केलेल्या १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता व परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील प्रमुख ५ पिकांचे २० टक्के सर्वेक्षण आणि ‘ग्राउंड ट्रथिंग’ केले जाईल, ज्यामुळे तेथील खरीप पिकांच्या नुकसानीचा अचूक अंदाज बांधता येईल, असे सूत्रांनी सांगितले. सविस्तर वाचा ————– हेही वाचा.. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक संभाजीनगरात:पीक विम्यावर अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले- वैयक्तिक तक्रारी सोडवू यंदा पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यात खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले असून, अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. या भीषण दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे एक विशेष पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. काल रात्री उशिरा या पथकाने विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मराठवाड्यातील पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. आजपासून या पथकाने प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन स्थळपाहणीला सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *