Headlines

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 81 केंद्रांवर मतदान:विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाची मान्यता, 23 ऑक्टोबरला होणार मतदान




अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील ८१ केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी पाठवलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांमध्ये ही ८१ मतदान केंद्रे आहेत. येत्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत शिक्षक मतदार आपला हक्क बजावतील. अमरावतीमध्ये २५, अकोल्यात १३, बुलढाण्यात १८, वाशिममध्ये ७ आणि यवतमाळमध्ये १८ मतदान केंद्रे असतील. मतमोजणी विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवनात केली जाईल. जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. प्रत्येक केंद्रात किमान १५० मतदार असतील आणि दोन केंद्रांमधील अंतर १४ किलोमीटरपेक्षा जास्त नसेल. सुमारे ३२ हजार शिक्षक मतदानासाठी पात्र आहेत. मतदारांची नेमकी संख्या १२ ऑक्टोबरला जाहीर होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *