Headlines

जिल्ह्यात आज 1826 मंडळांत होणार घटस्थापना‎:269 गावांत एक गाव एक दुर्गोत्सव, 850 होमगार्ड्स, एसआरपीएफ तैनात




यंदा अकोला जिल्ह्यात दुर्गोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून, जिल्ह्यात एकूण १५४३ दुर्गोत्सव मंडळांची नोंद झाली आहे. या मंडळांमध्ये दुर्गा मातेची प्रतिष्ठापना होऊन घटस्थापना होणार आहे. एकूण १५४३ दुर्गोत्सव मंडळांपैकी शहरी भागात ५६७ मंडळे आहेत. ग्रामीण भागात ९७७ मंडळे आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात सामाजिक सलोखा जपत २६९ गावांमध्ये ‘एक गाव एक दुर्गा’ उपक्रमांतर्गत देवीची स्थापना करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यात २८३ ठिकाणी शारदा उत्सव साजरा होत आहे. यामध्ये शहरी भागातील ६८ आणि ग्रामीण भागातील २०८ मंडळांचा समावेश आहे. दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात भक्तिमय वातावरण आहे. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांकडून मंडपांची तयारी, सजावट आदींची कामे सुरू होती. काही मंडळांच्या मंडपांमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे आगमन झाले. पूजेचे साहित्य, डेकोरेशन, विद्युत रोषणाई आदींची कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू होती. त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. दुर्गोत्सव मंडळे एक गाव एक दुर्गोत्सव शारदोत्सव गरब्यासाठी बंदोबस्त गरबा व दांडिया कार्यक्रमांच्या ठिकाणी महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी विशेष पोलिस बंदोबस्तासह ‘दामिनी पथक’ सज्ज राहणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. असे आहेत दुर्गामाता प्रतिष्ठापनेचे शुभ मुहूर्त दुर्गा माता प्रतिष्ठापनेचा सकाळचा पहिला मुहूर्त हा सकाळी ८.४५ ते ९.३० या वेळेत आहे. दुसरा मुहूर्त हा दुपारी ११.४५ ते १२.३० या वेळेत अभिजित मुहूर्त आहे. संध्याकाळचा मुहूर्त (प्रदोष काळ) हा संध्याकाळी ६.०० ते रात्री ८.३० या वेळेत प्रदोष काळातील शुभमुहूर्त आहे. नवरात्रोत्सवात १९ तारखेपर्यंत अष्टमी व नवमीची तिथी आहे. १९ व २० ऑक्टोबरला हवन पार पाडले जाऊ शकते. १९ तारखेनंतर नवमी तिथी पूर्ण होऊन २० तारखेला दसरा साजरा केला जाईल, असे पं. अनुराग तिवारी महाराज यांनी सांगितले. दुर्गोत्सव आकडेवारीत प्रत्येक मंडळासाठी ‘दत्तक अंमलदार’ गणेशोत्सवाच्या धर्तीवर दुर्गोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मंडळासाठी एका ‘दत्तक अंमलदारा’ची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनातर्फे भाविक व आयोजकांच्या मार्गदर्शनासाठी सूचना फलक लावले जात आहेत. सर्व आयोजकांना उत्सव मंडप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *