Headlines

काँग्रेसचा जन आक्रोश दुष्काळ मोर्चा:छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 ऑक्टोबरला सरकारला घेरणार; पीक विमा, कर्जमाफीसह अनेक मागण्या




मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि खरीप पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्यांवर काँग्रेसने आवाज उचलला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ ऑक्टोबर रोजी ‘जन आक्रोश दुष्काळ मोर्चा’ काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रति हेक्टरी मदत देण्याची प्रमुख मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ७० दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला असतानाही सरकार केवळ पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. गेल्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विरोधी पक्षनेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मागील हंगामातील पीक विमा, चालू हंगामातील नुकसानभरपाई, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे आणि फळबागांसाठी दोन लाख रुपयांची मदत देणे या प्रमुख मागण्या आहेत. याशिवाय पाणी, चारा, रोजगार आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *