Headlines

सोयाबीन मळणी यंत्रात अडकून शेतमजुराचा मृत्यू;:कुटुंबाला शासकीय मदत देण्याची मागणी




माहूर तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी संदीप आत्माराम कऱ्हाळे (वय 34) यांचा साकूर शिवारात सोयाबीन मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी घडली. संदीप कऱ्हाळे हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ते रोजंदारीने साकूर शिवारातील एका शेतात सोयाबीन काढण्याच्या कामासाठी मळणी यंत्रावर गेले होते. मळणी यंत्र सुरू असताना अचानक त्यांचा झोक जाऊन ते यंत्रात अडकले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी माहूर येथे आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. संदीप कऱ्हाळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता आणि कमावता व्यक्ती हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आधीच रोजंदारीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबासमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेतील मृत शेतमजुराच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. हे ही वृत्त वाचा धावत्या रेल्वेमधून उतरताना सोनार कारागीर गंभीर जखमी:लासूरगावाजवळील घटना, डोक्याला दुखापत, उपचार सुरू‎
छत्रपती संभाजीनगरहून लासूरला येण्यासाठी चुकीच्या रेल्वेत बसलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या एका कारागिराने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला. यात तोल जाऊन पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. तापस डुला (४१, रा. फत्तेपूर, पश्चिम बंगाल, ह. मु. छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव असून, ते लासूरस्टेशन येथील एका सराफा दुकानात कामाला आहेत. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *