![]()
अमेरिकेचा नागरिक व आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान शनिवारी मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीच्या निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता. आपण अमेरिकेचा नागरिक असल्याचे त्याने लपवून ठेवले. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या मागणीवरून पोलिसांनी बीएनएस कलम २२३ व १८९ अन्वये गुन्हा दाखल केल्यावर इम्रानने आपण ‘सामान्य नागरिक’ म्हणून आलो असल्याची सारवासारव केली. त्याला समज देऊन सोडण्यात आले. मात्र, पुढे दोषी आढळल्यास सरकार त्याचे ओसीआय कार्ड, व्हिसा सवलत रद्द करू शकते. परकीय मूळ भारतवंशीयांना भारतात विनाव्हिसा येऊन कामाची मुभा देणाऱ्या ओळखपत्रास ओसीआय कार्ड म्हणतात. ओसीआय कार्डधारकाला
घटनात्मक हक्क नाही संविधानाच्या कलम १९ नुसार ओसीआय कार्डधारक म्हणजे परदेशी नागरिकांना राजकीय आंदोलनात सहभागी होण्याचा घटनात्मक हक्क नाही. नागरिकत्व कायदा, १९५५ च्या कलम ७डी नुसार स्थानिक कायद्यांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास केंद्रीय गृह मंत्रालय संबंधित व्यक्तीचा ओसीआय दर्जा, व्हिसा सवलत रद्द करू शकते.
Source link
अमेरिकेचा नागरिक अभिनेता इम्रान खानही कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी:आंदोलनात परदेशी लोकांचा शिरकाव, ओसीआय कार्ड रद्द होऊ शकते