![]()
तालुक्यात केपीआय अंतर्गत पात्र शिधापत्रिकांची संख्या तब्बल ५,२९८ ने कमी करण्यात आली आहे. या प्रक्रियेत तालुक्यातील गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या शिधापत्रिका शुभ्र श्रेणीमध्ये वर्ग करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अनेक पात्र लाभार्थी शासनाच्या अन्नधान्य लाभापासून वंचित राहण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत सखोल चौकशी करून संबंधित निरीक्षण अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने दि.१२ रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त झालेली यादी कोणतीही स्वतंत्र तपासणी व पडताळणी न करता सरसकट शुभ्र श्रेणीत वर्ग केल्यामुळे तालुक्यातील हजारो गरीब कुटुंबे हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत असताना, अशा प्रकारच्या कारभारामुळे अन्नधान्याचा आधार मिळणे कठीण झाले आहे. निवेदनामध्ये एका खाजगी संगणक चालकावर विनाआदेश लॉगिन वापरून, कुठलीही कागदपत्रे न घेता थेट आधार कार्डवरून नवीन रेशन कार्ड निर्गमित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच पब्लिक लॉगिनमधून अर्ज करणाऱ्या नागरिकांना ३० दिवसांचा अवधी सांगितला जात असताना, आर्थिक हितसंबदांमुळे एका-दोन दिवसांत कागदपत्रे दिली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निरीक्षण अधिकाऱ्यांनी स्वतःचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी शासकीय गोदामावर विनाआदेश खाजगी व्यक्तींना ठेवले आहे का, याचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात केपीआय अंतर्गत शुभ्र श्रेणीत वर्ग करण्यात आलेल्या सर्व शिधापत्रिकांची पुनर्तपासणी करावी, शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीवर संबंधित निरीक्षण अधिकाऱ्यांनी कोणती तपासणी केली, याची चौकशी करावी. पात्र असूनही शुभ्र श्रेणीत गेलेल्या शिधापत्रिका तत्काळ त्यांच्या मूळ पात्र योजनेत पूर्ववत कराव्यात, संबंधित निरीक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार निलंबनाची कारवाई करावी, खाजगी संगणक चालकाच्या बेकायदेशीर वापराबद्दल आणि डीईओ लॉगिन कोणाच्या आदेशाने सुरू झाले, याची सखोल चौकशी करण्यात यावी, जर या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून योग्य न्याय मिळाला नाही, तर आगामी काळात सर्व बाधित शिधापत्रिकाधारकांना सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आर. के. राठोड, जिल्हा उपाध्यक्ष रवी पाटील राऊत, तालुका कार्याध्यक्ष मुकेश मुंजे, राहुल जाधव, फिरोज परसुवाले, रोहिदास चव्हाण, पांडुरंग खंडारे, निलेश ठाकरे, रमेश राठोड, साबीर फकिरावाले, पवन गुप्ता, कपिल राठोड आदींची उपस्थिती होती. आधार कार्डवरून रेशन कार्ड निर्गमित केल्याचा आरोप सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत असताना, अशा प्रकारच्या कारभारामुळे अन्नधान्याचा आधार मिळणे कठीण झाले आहे. निवेदनामध्ये एका खाजगी संगणक चालकावर विनाआदेश लॉगिन वापरून, कुठलीही कागदपत्रे न घेता थेट आधार कार्डवरून नवीन रेशन कार्ड निर्गमित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच पब्लिक लॉगिनमधून अर्ज करणाऱ्या नागरिकांना ३० दिवसांचा अवधी सांगितला जात असताना, आर्थिक हितसंबदांमुळे एका-दोन दिवसांत कागदपत्रे दिली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
Source link
केपीआयंतर्गत शिधापत्रिका पुनर्वर्गीकरणात हलगर्जीपणा:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे चौकशीची मागणी