Headlines

परप्रांतीय मजूर महिलेवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार:मखमलाबाद रोड परिसरातील घटनेने नाशिक हादरले, संशयितांना अटक




आजारपणाचा आणि असाहाय्यतेचा गैरफायदा घेत परप्रांतीय आदिवासी महिलेला ग्लुकोज पावडरमधून गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार मखमलाबाद रोड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी म्हसरू‌ळ पोलिस ठाण्यात विक्रम इंद्रजीत साह (30) आणि अशोक चंडिका साह (36, दोघेही रा. बिहार) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित महिला आणि संशयित हे एकाच ठिकाणी मजुरीचे काम करत असल्याने त्यांची तोंडओळख होती. रात्री 8 वाजेच्या सुमारास महिलेची तब्येत अचानक बिघडली. संशयितांनी तिला दुचाकीवरून पंचवटीतील एका दवाखान्यात नेले. मात्र, उपचार करून तिला साइटवर राहणाऱ्या तिच्या पतीकडे न सोडता, संशयित विक्रमने तिला आपल्या खोलीवर नेले. तेथे रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तिच्यावर अत्याचार सुरू होते. कायद्याचा बडगा या प्रकरणात कलम 170(1) (सामूहिक बलात्कार) अंतर्गत 20 वर्षांचा सश्रम कारावास ते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तसेच कलम 64(1) (बलात्कार), कलम 351(2) आणि 352 (धमकी देणे, धाक दाखवणे) या गुन्ह्यांमध्येही कारावासाची तरतूद आहे. याशिवाय ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. सखोल तपास करणार पीडित महिलेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, पोलिस कोठडीत त्यांची सखोल चौकशी केली जाईल. आणखी काही मजूर महिलांवर या दोघांनी अशा प्रकारे अत्याचार केले आहेत का, याचाही संशय आहे. – अतुल ढहाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हसरूळ पोलिस ठाणे दवाखान्यात शिजला कट दवाखान्यातच संशयितांची नियत फिरली होती. खोलीत अशोक साह आधीपासूनच बसलेला होता. ग्लुकोज पावडरमध्ये गुंगीचे औषध मिसळून दोघांनी रात्रभर तिच्यावर अत्याचार केले. वेदनेने व्याकूळ झालेल्या महिलेने त्यांना सोडण्याची विनवणी केली. मात्र, हा प्रकार कुणाला सांगितलास तर तुला आणि तुझ्या पतीला जीवे मारू, अशी धमकी या नराधमांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *