![]()
नागपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलेच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर धारदार शस्त्र आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. याहल्ल्यात वसीम अख्तर हे गंभीर जखमी झाले आहे. नागपूरच्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केटीनगर येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सूरज नगर येथील रहिवासी असलेले 43 वर्षीय वसीम अख्तर हे गादी बनविण्याचे काम करतात. रात्रीच्या सुमारास ते नमाज पठणासाठी जात असताना 4 जणांच्या गटाने त्यांना घेरले आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मानकापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका आरोपीला अटक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत जाफर नगर येथील अरमान खान या आरोपीला अटक केली आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्याचे पीएसआय दीपक इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी शहनवाज खान याने आपल्या पत्नीला तलाक दिल्यानंतर त्या महिलेने वसीम अख्तर यांच्याशी विवाह केला होता. याच पूर्ववैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 3 आरोपींचा शोध सुरू पोलिस निरीक्षक दीपक इंगळे म्हणाले की, केटीनगर परिसरात वसीम अख्तर यांना चाकू, काठी, दगडाने मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींचा शोध सुरू आहे. हे ही वृत्त वाचा परप्रांतीय मजूर महिलेवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार:मखमलाबाद रोड परिसरातील घटनेने नाशिक हादरले, संशयितांना अटक
आजारपणाचा आणि असाहाय्यतेचा गैरफायदा घेत परप्रांतीय आदिवासी महिलेला ग्लुकोज पावडरमधून गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार मखमलाबाद रोड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात विक्रम इंद्रजीत साह (30) आणि अशोक चंडिका साह (36, दोघेही रा. बिहार) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Source link
नागपूर हादरले:पत्नीच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, एकाला अटक, इतरांचा शोध सुरू