Headlines

लोकशाहीत आंदोलनावर बंदी घालता येणार नाही:अन्यथा पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल- खासदार संजय राऊत




देशात हुकूमशहांकडून आंदोलनावर बंदी आणण्यात आली आहे का? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. लोकशाहीप्रधान देशात अशा प्रकारे आंदोलनावर बंदी घालता येणार नाही. जर अशी जबरदस्ती केली गेली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, आंदोलन केले म्हणून पाच काय, पाचशे गुन्हे दाखल होऊ द्यात. सरकारला याचे काय कौतुक वाटते आहे का? मुंबईत आमच्या आंदोलकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि अमित ठाकरे यांच्या नावांचा समावेश आहे. गुन्ह्यांची भीती नक्की कोणाला दाखवत आहात? करा गुन्हे दाखल आणि करा अटक! पण आता तुमच्या जाण्याची वेळ आली आहे. येत्या सहा महिन्यांत तुम्हाला दिल्लीतून गाशा गुंडाळावाच लागेल. राहुल गांधी इंडिया आघाडीच्या खासदारांशी चर्चा करणार संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना आणि खासदारांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. कालचे आंदोलन पूर्णपणे यशस्वी झाले आहे. आजच्या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होऊन दिशा ठरवली जाईल. त्यानंतर राहुल गांधी स्वतः पत्रकारांशी संवाद साधतील. सध्या आम्ही सर्व नेते व खासदार दिल्लीतच असून सायंकाळी अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. निवडणूक आयोगावर दबाव नसावा संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगातील कथित गैरप्रकार थांबले पाहिजेत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. निवडणूक आयोगावर कोणताही राजकीय दबाव असता कामा नये. यासोबतच ‘एसआयआर’ प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी आणि मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या सर्व 13 कोटी मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत. हे ही वृत्त वाचा मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी आता 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ:मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *