Headlines

Vikram Pashpute Slams Rohit Pawar Over MPSC Student Protest Controversy


“पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या 12 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर तोडगा निघाला, यात मध्यस्थी करणारे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि चौथ्यांदा संवेदनशीलतेने वेळ देणारे मुख्यमंत्री यांचे आभार. मात्र, हे आंदोलन संपल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रात

.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार विक्रम पाचपुते यांनी दोन व्हिडिओ क्लिप्स सादर करत, आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांचा झालेला भ्रमनिरास, अध्यक्षांचा राजीनामा न मिळाल्याने आंदोलन सोडून गेलेले खरे विद्यार्थी आणि आंदोलन संपल्यानंतर घटनास्थळी संविधानाची झालेली कथित उपेक्षा यावर थेट बोट ठेवले.

30 तारखेला ठरले तेच परवा झाले, मग 12 दिवस विद्यार्थ्यांची दिशाभूल कशासाठी?

आंदोलनाच्या फलनिष्पत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आमदार पाचपुते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी 6 तारखेला, 10 तारखेला आणि त्यानंतर रोहित पवारांच्या शिष्टमंडळासोबत 30 तारखेला बैठक घेतली. 30 सप्टेंबरच्या बैठकीतच न्यायालयीन चौकशी करण्याचे ठरले होते आणि त्यांच्याच शिष्टमंडळाने बाहेर येऊन तसे जाहीर केले होते. मग परवा नेमके नवीन काय मिळाले?”

राजीनाम्याचा खोटा हट्ट

“आम्हाला फक्त आणि फक्त एमपीएससी अध्यक्षांचाच राजीनामा हवा, या एकाच मुद्द्यावर रोहित पवारांनी आंदोलन ताणून धरले. मात्र संविधानाच्या कलम 317 नुसार राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीशिवाय अध्यक्षांचा थेट राजीनामा घेता येत नाही, ही कायदेशीर वस्तुस्थिती समजायला रोहित पवारांना 12 दिवस लागले. एलईडीच्या जमान्यात त्यांची ट्यूबलाइट अजूनही जुन्या मर्क्युरीवरच चालते, म्हणूनच ते महाराष्ट्राचे नवे ‘पप्पू’ ठरले आहेत.”

सक्तीची रजा हा फेक नरेटिव्ह

“अध्यक्ष विवेक भीमनवार हे स्वतःहून नैतिकतेच्या आधारावर रजेवर गेले आहेत. त्यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी तसा कोणताही आदेश दिलेला नाही. जर रोहित पवारांकडे तसा शासन आदेश असेल, तर त्यांनी तो मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीसह मीडियासमोर आणून दाखवावा.”

व्हिडिओत वास्तव; विद्यार्थी माघारी फिरले, रोहित पवार विनवण्या करत राहिले!

पत्रकार परिषदेत दोन व्हिडिओ सादर करत पाचपुते यांनी आंदोलनावर टीका केली. “आंदोलनाच्या मंचावर रोहित पवार भाषण करत असताना आणि ‘अध्यक्ष नकोत’ असे सांगत असतानाच मागून विद्यार्थी उठून निघून जात असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. रोहित पवार त्यांना थांबण्याची विनंती करत होते, पण विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला होता. केवळ राजकीय स्वार्थासाठी आपला वापर होत असल्याचे लक्षात येताच मूळ विद्यार्थी निघून गेले आणि तिथे फक्त राजकीय कार्यकर्ते उरले.”

दुसरा व्हिडिओ- संविधानाचा अवमान

“आंदोलन संपल्यानंतरचे चित्र अत्यंत संतापजनक होते. तिथून उठताना कोणी स्वतःची पाण्याची बाटली विसरले नाही, महागडे कॉफी मग, चार्जर किंवा पॉवर बँक्स विसरले नाहीत; पण भारताचा राष्ट्रध्वज आणि संविधानाची प्रत तिथेच कचऱ्यासारखी सोडून गेले! केवळ हातात संविधान घेऊन मिरवायचे आणि प्रत्यक्षात त्याची पायमल्ली करायची, हाच काँग्रेस आणि रोहित पवारांचा खरा अजेंडा उघडा पडला.”

तुकाराम मुंढेंचा 100 वेळा जप का? स्वतःचे उद्योग अडचणीत असल्याने लक्ष विचलित करण्याचा डाव!

चौकशी समितीच्या सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नावाचा हट्ट धरण्यामागील कारणांवर त्यांनी संशय व्यक्त केला. “आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी रोहित पवारांनी मंचावरून तुकाराम मुंढेंच्या नावाचा 100 हून अधिक वेळा जप केला. वारकरी संप्रदायात ‘तुकाराम तुकाराम’ म्हटले की देव प्रसन्न होतो, तसाच काहीसा हा प्रकार होता.”

“विद्यार्थ्यांच्या मेसेज आणि स्क्रीनशॉट्सवरून संशय येतोय की, रोहित पवारांचे अनेक वेगवेगळे उद्योग आणि संस्था सध्या अडचणीत आहेत. त्या व्यवसायांवर कारवाई होऊ नये म्हणून तुकाराम मुंढेंचे लक्ष विचलित करण्यासाठीच त्यांना या समितीच्या कामात गुंतवून ठेवण्याचा हा पूर्वनियोजित डाव तर नाही ना? याचे संशोधन आणि चौकशी झाली पाहिजे.”

राहुल गांधींनी पाठ फिरवली, शेवटी मुख्यमंत्र्यांपुढे लोटांगण घालावे लागले

आंदोलनातील काँग्रेस कनेक्शनवर भाष्य करताना पाचपुते म्हणाले, “रोहित पवारांची अशी अपेक्षा होती की या आंदोलनाच्या निमित्ताने राहुल गांधी पुण्यात येतील आणि राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित होईल. मात्र, राहुल गांधींच्याही लक्षात आले की रोहित पवारांकडे तेवढी क्षमता नाही आणि ते विद्यार्थी एकत्र ठेवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी वेळ दिला नाही. शेवटी आंदोलन अंगलट आल्याचे पाहून आणि स्वतः तयार केलेल्या चक्रव्युहात अडकल्याचे लक्षात येताच रोहित पवारांना मुख्यमंत्र्यांपुढे लोटांगण घालावे लागले.”

पुण्यात केरळची टीम कशासाठी आली होती?

“आंदोलनाच्या काळात पुण्यामध्ये केरळमधील काही संशयास्पद संस्था आणि टीम्स वास्तव्यास होत्या, अशी माहिती समोर येत आहे. त्या टीम्स कोणी पाठवल्या होत्या आणि समाजात अस्थिरता निर्माण करून अर्बन नक्षल तयार करण्याचा हा कट होता का, याचा तपास गुप्तचर यंत्रणांनी केला पाहिजे.”

कर्जत-जामखेडमधून पुन्हा लढून दाखवा; पाचपुतेंचे थेट आव्हान!

रोहित पवारांच्या आगामी दुष्काळ दौऱ्यावरून टीका करताना आमदार पाचपुते यांनी त्यांना थेट राजकीय आव्हान दिले. “आंदोलनात गर्दी जमवण्यासाठी मंचावरून सुकट, बोंबील आणि मटण बिर्याणीच्या गप्पा मारणारे रोहित पवार आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाचे अश्रू ढाळणार आहेत, ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे.”

2029चे आव्हान

“रोहित पवारांनी मला 2029 ला निवडून येऊन दाखवण्याचे चॅलेंज दिले होते. मी त्यांना सांगतो की माझे भवितव्य श्रीगोंद्याची स्वाभिमानी जनता ठरवेल. हिंमत असेल आणि स्वतःवर विश्वास असेल, तर रोहित पवारांनी पुन्हा एकदा कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवून दाखवावी; तिथली जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.” शेवटी बोलताना, “10 दिवसांत विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रोहित पवारांनी जाहीर माफी मागावी,” अशी मागणी विक्रम पाचपुते यांनी केली.

———————————————————–

हेही वाचा….

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी आता 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ: मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.