![]()
शहरातील भवानीनगर प्रभागात माजी नगराध्यक्ष सोमनाथपरदेशी यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेविका वैशाली ईश्वर परदेशी व नगरसेवक महेश मुंदडा यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे भवानीनगर परिसरातील शमी गणपती ते रेणुका माता मंदिर दरम्यानचा संपूर्ण परिसर स्वच्छ व निर्मळ करण्यात आला. यावर्षी पैठण शहरात अनेक मंडळांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दांडियाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. यामध्ये भवानीनगर येथील जय भवानी राज दांडिया उपक्रमही रद्द करण्यात आला. या पार्श्वभूमीवर परिसरातील महिलांनी केवळ उत्सव रद्द न करता, दांडियाऐवजी स्वच्छता मोहिमेचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला. याद्वारे नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. परिसर स्वच्छ राहिल्यास आरोग्य उत्तम राहील व रोगराई पसरणार नाही, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या मोहिमेत नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनीही मोलाचे योगदान दिले. या स्वच्छता मोहिमेत नगरसेविका वैशाली परदेशी, पूनम मुंदडा, प्रीती जाधव, जलकन्या काळे, डॉ. मेघा दळवी, डॉ. उषा शिंदे, कल्पना लोखंडे, भारती रावस, मथुरा बडे, राखी बजाज, मालन घडचे, पूनम काळे, अमृता काळे, संगीता जाधव, कल्पना सर्जे, ज्योती गालफडे, पार्वती दारुणकर, छाया नाडे, संगीता सनवे यांच्यासह इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिसरातील महिलांनी केवळ उत्सव रद्द न करता, दांडियाऐवजी स्वच्छता मोहिमेचा एक अत्यंत अनोखा उपक्रम हाती घेतला. याद्वारे नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. यापुढेही उपक्रम राबवणार असल्याचे वैशाली परदेशी यांनी सांगितले. प्रभागातील महिलांचाही उपक्रमात सहभाग यावेळी नगरसेविका वैशाली परदेशी म्हणाल्या की, प्रभागातील महिलांच्या थेट सहभागातून राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमेला वेगळेच महत्त्व असते. कारण ज्या परिसरातील महिला स्वतः स्वच्छता करतात, तिथे कचरा टाकताना नागरिकही विचारपूर्वक पावले उचलतात. तसेच मोहिमेत सहभागी झालेल्या महिला स्वच्छ केलेल्या भागावर कायम लक्ष ठेवतात, ज्यामुळे तो परिसर कायमस्वरूपी स्वच्छ व निर्मळ राहण्यास मदत होते.
Source link
पैठणला महिलांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम:नगरसेविका वैशाली परदेशी, महेश मुंदडा यांचा विविध प्रभागांमध्ये उपक्रम