Headlines

दुष्काळात कमाई:पाणीटंचाईमुळे संभाजीनगरात 169 टँकर, राज्यात सर्वाधिक, राज्यात पाणी पुरवणाऱ्या 768 पैकी 753 टँकर खासगी




राज्यात ऑक्टोबर महिन्यात एरवी जलसाठे तुडुंब भरलेले असतात. मात्र गेल्या ३ वर्षांत पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र टँकरग्रस्त होऊ लागला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या ऑक्टोबरमधील पहिल्या आठवड्याच्या अहवालानुसार १० जिल्ह्यांत ६३५ गावे आणि २,४४७ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा सर्वाधिक १६९ टँकरसह राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शासकीय १५ आणि खासगी ७५३ असे मिळून एकूण ७६८ टँकर धावत आहेत. विभागीय पातळीवर विचार केल्यास छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ३७४ टँकर सुरू आहेत. डिसेंबरनंतर ७० टक्के जिल्ह्यांत टँकरची गरज पडू शकते. दरम्यान, टँकरमुक्ततेसाठी मतदारसंघनिहाय नियोजन झाले आहे. त्यात वैजापूर, नेवासा आदी अतिटंचाईग्रस्त भागांतील आमदारांशी चर्चेनंतर टंचाई आराखडे अंतिम केले जात आहेत. खासगी विहिरींचे अधिग्रहण अधिकृत करणे, तसेच गरजेनुसार नवीन बोअरवेल किंवा विहिरी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी पावसाळा लांबल्याने राज्य टँकरमुक्त होते महाराष्ट्रात गेल्या वर्षी मे महिन्यांत पूर्वमोसमी आणि त्यानंतर दमदार पाऊस झाला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू होता. आॅक्टोबरमध्ये सरासरी ११ दिवसांत ११३.९ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ५१ मिमी पाऊस पडला. परिणामी २०२५मध्ये राज्यात टँकरद्वारे पाणी पुरवण्याची वेळ आली नाही. २०२४मध्ये आॅक्टोबर महिन्यात १२१.८ मिमी तर नोव्हेंबरमध्ये १५.५ मिमी पाऊस पडला होता. त्यामुळे २०२४मध्येही राज्यात आॅक्टोबर महिन्यांत टँकरद्वारे पाणी पुरवण्याची गरज निर्माण झाली नव्हती. यंदा तशी स्थिती नाही. राज्य सरकार व्हीव्हीआयपींसाठी १२.६८ कोटींची ४४ आलिशान वाहने खरेदी करणार मुंबई | एकीकडे दुष्काळ निधीची केंद्राकडे मागणी करणारे राज्य सरकार राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांच्या दिमतीसाठी १२ कोटी ६८ लाख ६४ हजार ३४२ रुपयांची ४४ नवी वाहने खरेदी करणार आहे. आरटीओ, राजशिष्टाचार ताफ्यातील वाहने जुनी झाली असे सांगून विविध जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांकडूनही नव्या गाड्यांची सातत्याने मागणी होत होती. या खरेदीवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, शेतकरी होरपळत असताना सरकार व्हीव्हीआयपी गाड्यांवर उधळपट्टी करत आहे. त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड नको, म्हणून ही खरेदी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *