Headlines

कन्नड येथील खूनप्रकरणी दांडा, रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त:कन्नड न्यायालयाकडून आरोपीस 3 दिवसांची पोलिस कोठडी‎




चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करणाऱ्या पतीस कन्नड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गजानन कॉलनी, कन्नड येथे सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुकेश कुंभकर्ण याने पत्नी रोहिणी (४४) हिचा खून केला होता. घटनेनंतर आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्यास मंगळवारी न्यायालयाने कोठडी सुनावली आहे . या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ रवींद्र रामदास घडमोडे (४५, रा. अंधारी, ता. सिल्लोड) यांनी कन्नड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. रोहिणी यांचा विवाह २००३ मध्ये मुकेश याच्याशी झाला होता. या दांपत्याला ईशान (१९) हा मुलगा आणि निशा (२२) ही मुलगी आहे. कन्नड शहर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश दिंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून लाकडी दांडा, रक्ताने माखलेले कपडे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास प्रशिक्षणार्थी डीवायएसपी आरती पवार करत आहेत. दोन दिवस जेवण नाकारले अटक झाल्यापासून आरोपीने जेवण केलेले नाही. तो नैराश्यात असून आता माझी सुटका होणार नाही, असे हताशपणे पुटपुटत आहे. समुपदेशन करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी सपोनि पानपाटील यांना सूचना दिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *