Headlines

कन्नडमध्ये 2 हजार 683 मंजूर कामे ठप्प:पंचायत समितीने संवेदनशील राहून रोहयोची कामे सुरू करावी, डॉ. राजपूत यांची मागणी‎




कन्नड तालुक्यात मोठा दुष्काळ पडला असून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यासाठी परि पत्रकही जारी करण्यात आले. मात्र २ हजार ६८३ मंजूर कामेही बंद पडलेले आहेत. पंचायत समिती प्रशासनाने संवेदनशील राहून ही कामे त्वरित सुरू करावीत अशी मागणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिलीपसिंग राजपूत, जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत यांनी गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात डॉ. राजपूत यांनी पंचायत समिती अंतर्गत दुष्काळी कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने १ ऑक्टोबरला परिपत्रक जारी करून पंचायत समिती अंतर्गत रोहियोचे कामे त्वरित सुरू करा, जी रामजी योजने अंतर्गत विकसित भारत सन २०२७-२८ च्या आराखड्यानुसार जलसंधारण कामे सुरू करावेत, असे निर्देश दिले आहेत. यात जलसंधारण कामांना प्राधान्य द्यावे, त्यात विहिरीची बळकटीकरण, नदीचे खोलीकरण, रुंदीकरण करणे, पाणी अडविण्यासाठी सिमेंट नाला बांध, कोल्हापुरी बंधारे, शेततळे करणे, आडवे उभे बोअर घेणे, जल भंडार क्षमतेत वाढ करणे, धरण गाळ मुक्त करणे, भूजल पुनर्भरणासाठी विहिरींच्या सेल्फ वरील कामे करणे, नाल्यांचे पुनर्जीवन आदी कामांचा समावेश आहे. याकामांतून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. परंतु प्रशासकीय अधिकारी या संदर्भात उदासीन दिसून येत आहे. तालुक्यात एकाच महिन्यात नापिकीमुळे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावेळी गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत यांनी दीड वर्षापासून विविध कारणांनी कामे बंद पडलेले असल्याचे सांगितले. प्रकल्प अधिकारी संदीप गोंडा यांनी सांगितले की, ग्राम रोजगार सहायक २४ सप्टेंबरपासून संपावर गेलेले आहेत. पंचायत समितीच्या अंतर्गत मंजूर असलेल्या विहिरी, गाय गोठे, वृक्ष लागवड, शेततळे, जलसंधारणाचे आदी सर्व कामे थांबलेली आहेत. यावेळी सहायक गटविकास अधिकारी विजयकुमार पंडित, गट शिक्षणाधिकारी मनिष दिवेकर, संघर्ष बोलधने, खरेदी विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने आदींची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *