Headlines

युरोपचा ‘व्हाइट स्टॉर्क’ नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात:शुभ्र शरीर, लाल चोच अन् काळ्या पंखांच्या टोकांमुळे पक्षी ठरतोय सर्वांचे आकर्षण‎



युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेला ‘व्हाइट स्टॉर्क’ (पांढरा महाबलाक) हा देखणा स्थलांतरित पक्षी अनेक वर्षांच्या खंडानंतर नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दाखल झाला आहे. १० ऑक्टोबर या जागतिक प्रवासी पक्षी दिनाच्या निमित्ताने या राजबिंड्या पाहुण्या

.

पक्ष्यांच्या अथांग विश्वात निसर्गाने विविध रंगांची आणि वैशिष्ट्यांची उधळण केली आहे. काही पक्षी आपल्या मधूर आवाजाने मन जिंकतात, तर काही त्यांच्या रंगसंगतीने आणि उडण्याच्या शैलीने थक्क करतात. ‘व्हाइट स्टॉर्क’ हा त्यापैकीच एक देखणा पक्षी असून, त्याचे वैज्ञानिक नाव Ciconia आहे.

पाणथळ आणि दलदलीच्या भागांत फिरताना हा पक्षी बेडूक, लहान मासे, कीटक आणि उंदीर यांसारखे खाद्य मिळवतो. त्यामुळे तो पर्यावरणातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक ठरतो. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात अनेक वर्षांच्या खंडानंतर दाखल झालेल्या या देखण्या पक्ष्याचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमी नागरिकांसह पर्यटकांनी अभयारण्याला भेट द्यावी, असे आवाहन नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी केले आहे.

या पक्ष्याचे शरीर बर्फासारखे पांढरेशुभ्र असून, लांब पंखांच्या टोकांना काळा रंग असतो. लांब, टोकदार लाल चोच आणि उंच लाल पाय यामुळे त्याच्या रूपात वेगळीच नजाकत दिसते. हा पक्षी उभा राहिल्यावर त्याची उंची तीन ते चार फूट असते.

या पक्ष्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे, इतर अनेक पक्ष्यांप्रमाणे तो नेहमीच्या अर्थाने आवाज काढत नाही. तो आपली चोच एकमेकांवर जोरात आपटून ‘टॅक-टॅक-टॅक’ असा लाकडी ताशासारखा आवाज काढतो. या प्रक्रियेला ‘बिल क्लॅटरिंग’असे म्हणतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *