![]()
पुण्यातील वारजे भागात एका सोसायटीतील स्टेशनरी दुकानात मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सोसायटीतील रहिवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. ही घटना वारजे माळवाडी येथील राहुल पार्क सोसायटीत मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली. स्टेशनरी दुकानातील साहित्याने पेट घेतल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला, ज्यामुळे रहिवासी भयभीत झाले. आगीची झळ शेजारील गणेश भेळ या दुकानालाही बसली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान रमेश भिलारे, धर्मराव माने, निलेश तागुंदे, सिद्धेश भगत, आशिष पांगसे आणि दत्तात्रय शेटे यांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांनी अर्ध्या तासात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि दुकानात कोणी नसल्याची खात्री केली. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान परतले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. प्लॉट विक्रीच्या बहाण्याने १५ लाखांना गंडा आमचा प्लॉट विक्रीला आहे असे खोटे सांगून आणि फिर्यादीचा विश्वास संपादन करून तब्बल १५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कागदपत्रांची फेरफार करून हा गंडा घालणाऱ्या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी भरत ऊर्फ सागर विठ्ठल धुमाळ आणि विठ्ठल गणपतराव धुमाळ (दोघे रा. वीर, ता. पुरंदर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आनंद गोकुळ साळुंके (वय ४८, रा. स्वारगेट, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी साळुंके यांना त्यांचा एक प्लॉट विक्रीचा असल्याचे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून प्लॉट व्यवहारापोटी आरोपींनी १५ लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी जागेचे कुलमुखत्यारपत्र करून दिले, मात्र प्रत्यक्षात जागेचा ताबा दिला नाही. साळुंके यांनी जेव्हा जागेचा ताबा मागितला आणि खरेदीखत करण्याची विनंती केली, तेव्हा आरोपींनी टाळाटाळ करून त्यांचा विश्वासघात केला. हा सर्व प्रकार ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2026 दरम्यान घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर साळुंके यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.या प्रकरणाचा तपास सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी करत आहेत.
Source link
पुण्यात वारजे भागात दुकानाला आग:मध्यरात्रीच्या घटनेने रहिवाशांमध्ये घबराट, सुदैवाने जीवितहानी नाही