![]()
चांदूर रेल्वे शहरात गेल्या आठ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त व संतप्त झाले आहेत. कोणतेही वादळ, वारा किंवा पाऊस नसतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनासह व्यापारी व व्य
.
शहरात रात्री-अपरात्री वीज गायब होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामागील नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. निवेदन देताना आप नेते नितीन गवळी, मेहमूद हुसेन, मंगेश डाफ, सागर गावंडे, प्रशांत गावंडे, बादर खान, विनोद लहाने, सागर पटले, पायल पांडव, बालू गुडदे व इतर शहरवासी उपस्थित होते.
वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर किंवा अन्य विद्युत यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडत आहे का, याची सखोल तपासणी करावी. दोष तातडीने दूर करावेत. रात्री-अपरात्री अनावश्यकरित्या वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. ते थांबवावेत. शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. असे शहरवासीयांना वाटते.