![]()
राज्यात विविध समाजांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात आले. त्यापैकी बहुतांश मंडळांना निधीच मिळाले नाही. पण जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाने केंद्र सरकारकडून १०० कोटींचा निधी आणला आहे. निधी महामंडळाच्या खात्यावर जमा झाले आहे. त्यामुळे राज्यातील जैन समाजबांधवांकडून कर्जासाठी अर्ज मागण्यात आले. १३०० अर्ज आले असून, त्या अर्जांची छाननी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १ नोव्हेंबर पासून ५०० युवक व ३०० महिलांना कर्ज वाटप करण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया राबवताना दलाल निर्माण होऊ नये म्हणून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत आहे, अशी माहिती जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी दिली. महामंडळाच्या वतीने बिनव्याजी शिक्षण कर्ज देण्यात येत आहे. १ नोव्हेंबरपासून वाटप सुरू होईल. राज्यात जैन विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, मुंबई, प्रत्येक जिल्ह्यात १ प्रमाणे १८ वसतिगृह उभारण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून १७० अर्ज आले असून १५ कोटी वितरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जैन मुनीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सभागृह जैन मुनी विहार करत असलेल्या मार्गावर ज्या ठिकाणी आवश्यक आहे, त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत महामंडळाच्या वतीने सभागृह बांधण्यात येणार आहे. महाराज आले तर तेथे थांबतील. इतरवेळी शाळेसाठी सभागृह वापरता येणार आहे. यासाठी ३२५ ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. यावेळी केतन शहा, महेश भंडारी, सल्लाऊद्दीन शेख उपस्थितीत होते. सध्याचे राजकारण हे जाणीवपूर्वक सुरू देश व राज्यात जे काही राजकारणात सुरु आहे ते जाणीवपूर्वक घडवले जात आहे. न्यायालयावर मोर्चा नेऊन लोकशाहीचा विडंबना करण्यात येत आहे. वाया गेलेला जेन झी देशाला बदनाम करत आहेत असे गांधी म्हणाले.
Source link
जैन महामंडळाकडून एक नोव्हेंबरपासून कर्ज वाटप:500 युवक व 300 महिलांना प्राथमिक टप्प्यात लाभ