Headlines

आजच्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेत जीवनात यशस्वी व्हावे- जैस्वाल:सात्रळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, विद्यार्थ्यांना पारितोषिके




विद्यार्थ्यांनी आपल्या भावी आयुष्यात स्वतःला मर्यादित करू नये तसेच जीवनात कठोर परिश्रम घेऊन मोठे व्हावे त्याचबरोबर आई वडिलांचा तसेच शिक्षकांचा आदर ठेवावा असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिर्डी विभागीय कार्यालयाचे प्रबंधक अनिकेत जैस्वाल यांनी केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत संकुलात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभात जैस्वाल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कर्मवीर भाऊराव पाटील तसेच कॉ. पी. बी. कडू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू होते. प्रास्ताविक भाषणातून किरण कडू यांनी येथील शाळेचा इतिहास, शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देत शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्याचे सांगितले. स्टेट बँकेचे अधिकारी वैभव कदम तसेच दीक्षा नायक यांनी आपल्या मार्गदर्शनातून बँक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य करण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी बँकेविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांची उपस्थित अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे दिली. यामुळे विद्यार्थ्यांना बँकांचे कामकाज कसे चालते याबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली. संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेत ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे कर्मवीरांचे स्वप्न रयत संकुल पूर्ण करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गारुडकर, पर्यवेक्षक साबळे मॅडम, मुख्याध्यापिका ब्राह्मणे मॅडम तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पडघलमल, सोहनी मॅडम यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका ब्राह्मणे यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मिळाले बँकिंगचे अद्ययावत ज्ञान या उपक्रमात बँकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना बँकेबद्दल तसेच बँकेत काय कामकाज चालते याची माहिती मिळाली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बँकिंग ज्ञान मिळण्यास मोठी मदत मिळाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *