Headlines

लाडोळेतील सोपल गटातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश:गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करू- आ.राऊत‎




वैराग बार्शी तालुक्यातील लाडोळे गावात राजकीय घडामोडींना वेग आला असून, सोपल गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे लाडोळे गावातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वेळी रावसाहेब दत्तू गुंड, नागेश बबन उबाळे, चैतन्य नंदकुमार गुंड, सदाशिव विनायक गुंड, आनंद गुंड, संतोष सुभाष गुंड, भगवान कुंभार, अजित गुंड, विलास खेंदाड, आनंद सुरेश गुंड आणि बळीराम प्रभाकर गुंड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमात बोलताना आमदार राजेंद्र राऊत यांनी लाडोळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. गावातील साठवण तलावाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच वैराग–लाडोळे–उपळे (दु.) या मार्गावरील उर्वरित रस्त्याचे काम आणि गावातील पांदण रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर ही कामे मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश उर्फ सूर्यकांत गुंड यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीचे संचालक नंदकुमार पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आशिष गुंड यांनी उपस्थितांचे आभार मानले. युवकांनी व्यवसायाकडे वळावे : आ.राऊत गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी गावात भांडणतंटे होऊ नयेत, सामाजिक सलोखा कायम राहावा, असे आवाहन केले. तसेच युवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता उद्योग-व्यवसायाकडे वळून स्वतःच्या प्रगतीसोबतच गावाच्या विकासातही योगदान द्यावे, असे मत आ.राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *