Headlines

मंत्र्याला 'गेट आऊट' म्हणणाऱ्या महिलेविरोधात अखेर तक्रार:गुणरत्न सदावर्तेंच्या मुलीचा अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप




महिला आरक्षणाच्या मोर्चात मंत्री गिरीश महाजन यांना गेट आऊट फ्रॉम हिअर म्हणत धारेवर धरणाऱ्या महिलेविरोधात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदर महिला आपल्या मर्सिडिजमधून उतरून मोर्चात व्यत्यय आणत होती. मोर्चेकऱ्यांना असभ्य भाषेत बोलत होती. अवमानकारक शब्दांचा वापर करत होती, असे सदावर्ते यांच्या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने सोमवारी मुंबईत एका मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांच्या कन्या झेन सदावर्ते यांनी सदर महिलेविरोधात मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत झेन यांनी सदर महिलेवर मोर्चेकऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. झेन सदावर्तेंनी तक्रारीत काय म्हटले? झेन सदावर्ते पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या, सदर महिला आपल्या मर्सिडीजमधून उतरून मोर्चात व्यत्यय आणत होती. मोर्चेकऱ्यांना असभ्य बोलत होती. शट अप, डोन्ट टॉक टू मी, गेट आऊट सारख्या अवमानकारक शब्दांचा वापर करत होती. त्यामुळे मी याविषयी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांना सदर महिलेविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंतीही केली आहे. झेन यांच्या या तक्रारीनंतर वरळी पोलिस सदर महिलेविरोधात कोणती कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाजनांनी संयतपणे हाताळली परिस्थिती दुसरीकडे, ही स्थिती अत्यंत संयमाने हाताळणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांनी सदर महिलेने वाहतूक कोंडीमुळे संताप व्यक्त करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ते याविषयी बोलताना म्हणाले होते, सदर महिला वाहतूक कोंडीमुळे वैतागली होती. मोर्चामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन सामान्यांची गैरसोय होते. पण त्यावेळी एक महिला वाट्टेल त्या भाषेत बोलत होती. त्या महिला पोलिसांशीही असभ्य भाषेत बोलत होत्या. मी त्यांना आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेने मोर्चेकऱ्यांवरच पाण्याची बाटली फेकून मारली. भविष्यात या प्रकरणी कुणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. खाली पाहा व्हायरल अनकट व्हिडिओ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *