![]()
शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. बुधवारी पिसाळलेल्या कुत्र्याने दुकानातून बाहेर पडणाऱ्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याच्या हाताचे लचके तोडले. परिसरातील नागरिकांनी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी मुलाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. जखमी मुलाला पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी रेल्वे स्थानकासमोर देवेंद्र चौधरी (७) या चिमुकल्यावर हल्ला करून त्याच्या हातावर कानाखाली व पोटावर कुत्र्याने चावा घेतला. दुसऱ्या घटनेत अल्पिशा शेख (८) हिच्या पायावर चावा घेतला. यानंतर पाच नागरिकांना चावा घेतला. स्थानिक नगरसेवक भूषण जाधव आणि वसीम सय्यद यांनी खासगी ‘जीवाश्रय ॲनिमल वेल्फेअर’ टीमला पाचारण केले. या टीमने कुत्र्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले. कुत्र्याला पकडताना सर्वांचीच दमछाक झाली. अखेर रात्री उशिरा कुत्र्याला पकडण्यात यश आले. ^जीवाश्रय फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वॉर्डात श्वान पकडण्यासाठी माणसे नियुक्त करून त्यासोबत डॉग कॅचिंग व्हॅन देण्यात आलेली आहे. श्वानांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. – सूरज पाटील, आरोग्य अधिकारी भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण करून त्यांचा सुरक्षित व नियमानुसार बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे.
Source link
इगतपुरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन लहान मुलांसह पाच नागरिकांना चावा:चिमुकल्याच्या हाताचे लचके ताेडणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले