![]()
शहर व तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री माढेश्वरी देवीचा पारंपरिक कोजागिरी पौर्णिमा यात्रोत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेले आणि अठराव्या शतकातील ऐतिहासिक वारसा लाभलेले हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख
.
माढेधिपती श्रीमंत रावरंभाजी निंबाळकर यांनी सन १७२७ च्या सुमारास या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला भव्य स्वरूप दिले. हेमाडपंती आणि मराठा स्थापत्य शैलीचा संगम असलेल्या या मंदिराचे काळ्या पाषाणातील बांधकाम, नक्षीदार प्रवेशद्वार, भव्य दीपमाळा आणि दगडी ओवऱ्या आजही इतिहासाची साक्ष देतात. माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातून काम सुरू आहे.