Headlines

अकोटच्या पुरातन कालंका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी:चैत्र पौर्णिमेचा ‘खापऱ्या उत्सव’ अन् विसर्जन मिरवणुकीत मानपानाची परंपरा



शहरातील एलिचपूर वेस परिसरातील शिवाजी नगर भागात वसलेले पुरातन श्री कालंका माता मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे. वर्षभर या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. विशेषतः नवरात्रोत्सव, चैत्र पौर्णिमा आण

.

श्री कालंका माता मंदिराचा इतिहास नेमका कधीपासूनचा आहे, याची अधिकृत लेखी नोंद उपलब्ध नाही. मात्र, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सांगण्यानुसार हे मंदिर अतिशय पुरातन आहे. मंदिरातील कालंका मातेची मूर्ती स्वयंभू असल्याची आख्यायिका प्रचलित आहे. देवीची मूर्ती पद्मासन अवस्थेत असून महिला भाविकांकडून देवीचा आकर्षक शृंगार केला जातो. विविध अलंकारांनी सजवलेल्या देवीचे रूप अधिकच मनमोहक दिसते. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक मनोभावे पूजा- अर्चा करून नवस बोलतात, तसेच नवस पूर्ण झाल्यानंतर देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. मंदिर आकाराने छोटे असले, तरी त्याचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. श्रद्धा, भक्ती व परंपरेचा वारसा जपणाऱ्या या मंदिरात वर्षभर भाविकांची ये-जा सुरू असते. विशेष दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. ओटी भरण्याचा विधी आणि मानपानाची परंपरा पूर्ण झाल्यानंतर मिरवणुकीतील दुर्गादेवी पुढील मार्गाने मार्गस्थ होते. नवमीच्या दिवशी या परिसरात उत्साह व आनंदाचे वातावरण असते. परिसरातील नागरिक मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढतात. तसेच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक देवीची पूजा करून स्वागत केले जाते. त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक न राहता सामाजिक एकोपा व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक ठरतो.

वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : श्री कालंका माता मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. नवरात्रोत्सव, श्रावणमास, चातुर्मास तसेच दिवाळीच्या काळात विशेष धार्मिक उपक्रम राबवले जातात. याशिवाय प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सामूहिकरीत्या घेतले जातात. कार्यक्रमात मंदिराचे विश्वस्त, कार्यकर्ते व परिसरातील भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. सर्वांच्या सहकार्याने विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. धार्मिक विधी, देवीची पूजा-अर्चा व सामूहिक सहभागातून मंदिराची परंपरा जपली जात आहे. मंदिराचे कार्यकर्ते आणि भाविक मंडळी एकत्र येऊन उत्सवांचे नियोजन करतात. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सलोखा, परस्पर सहकार्य व सामूहिक सहभागाची भावना अधिक दृढ होते.

१९५९ मधील पुराबाबतची आख्यायिका : श्री कालंका माता मंदिराशी संबंधित आणखी एक आख्यायिका परिसरात प्रचलित आहे. सन १९५९ मध्ये अकोट शहराजवळून वाहणाऱ्या खाई नदीला मोठा पूर आला होता. या पुराचे पाणी शहरात शिरल्याने अनेक भागांना पुराचा फटका बसला होता. पुराचे पाणी श्री कालंका माता मंदिरातही शिरले होते, असे ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितले जाते. या आख्यायिकेनुसार, पुराचे पाणी मंदिरातील देवीच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करताच पूर ओसरू लागला. या घटनेची स्थानिकांमध्ये श्रद्धेने आठवण सांगितली जाते. या कथेला अधिकृत ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असल्याची माहिती नसली, तरी ती कालंका मातेविषयीच्या स्थानिक श्रद्धेचा व भाविकांच्या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत कालंका मातेचा विशेष मान अकोट शहरातील सार्वजनिक दुर्गा मंडळांच्या सामूहिक विसर्जन मिरवणुकीत श्री कालंका माता मंदिराला विशेष धार्मिक स्थान आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवातील नवमीच्या दिवशी सार्वजनिक दुर्गा मंडळांची विसर्जन मिरवणूक निघते. ही मिरवणूक श्री कालंका माता मंदिरासमोरून जात असल्याने या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी व धार्मिक विधीत सहभागासाठी भाविकांची गर्दी होते. या मिरवणुकीतील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे मानपानाचे आदानप्रदान. प्रत्येक दुर्गा मंडळाकडून कालंका मातेची ओटी भरली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *