![]()
शहरातील गरबा महोत्सवात रात्री भक्तिमय व उत्साहाचे वातावरण दिसून आले. शिस्तबद्ध पद्धतीने महिला व तरुणी ‘तारा विना श्याम मने, पंखिडा तु उडी जाजे, केसरियो रंग, ढोलीडा ढोलरे वागाड, सनेडो, चोगाडा तारा’ आदी गीतांवर गरबा नृत्य करत होत्या. नृत्य रिंगणाच्या बाहेरही पाहुण्यांना गरबा बघण्यासाठी खुर्च्या टाकलेल्या होत्या. मंडळांचे पदाधिकारी सर्व व्यवस्थेकडे लक्ष ठेवून होते. प्रवेशद्वारावर नाव नोंदवून व पास देऊनच आत सोडण्यात येत होते. दुर्गोत्सव व गरबा मंडळाच्या आत महिला पोलिस कर्मचारी तैनात होत्या. तसेच बाहेर पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. सकल ब्राह्मण समाज गरबा महोत्सवात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच इतर काही मंडळांनीही महिलांसाठी मोफत प्रवेश ठेवला आहे. तर, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व खर्चाचा मेळ घालण्यासाठी पुरुषांना गरबा खेळण्यासाठी ५० रुपयांचा सशुल्क पास ठेवण्यात आला आहे, अशी माहिती ब्राह्मण समाज नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. उत्सवात महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. गरबा प्रांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारासह आतील भागातही महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि ‘दामिनी पथक’ सातत्याने विविध मैदानांना अचानक भेटी देऊन परिस्थितीवर करडी नजर ठेवत आहेत, असे सकल ब्राह्मण समाज गरबा महोत्सवाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. महिला पोलिसांची असते करडी नजर
Source link
गरब्यात ‘ढोलीडा ढोलरे वागाड’वर ठेका:महिला सुरक्षेसाठी पोलिसांच्या दामिनी पथकांची तैनाती