![]()
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ आॅक्टोबरला मतदान होत आहे. त्यातील ४ जागांवर महायुतीत बंडखोरी झाल्याने अधिकृत उमेदवार संकटात सापडले आहेत. विशेषत: पुणे शिक्षक मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘नाशिक पॅटर्न’ राबवला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपने बंडखोर गोकुळ गितेंच्या मागे शक्ती उभी केली होती. त्यामुळे शिवसेनेचे (शिंदे) नरेंद्र दराडे पराभूत झाले होते. त्याचे उट्टे काढण्यासाठी शिंदेंनी अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. इनसाइड स्टोरी: शिंदे परतफेडीसाठी सक्रिय पाचही विधान परिषदेत महायुती आणि मविआमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसते. राजकीय अभ्यासकांच्या मते विरोधक प्रबळ नसल्याने महायुतीत बंडखोरी वाढली आहे. दुसरीकडे मविआतही ताळमेळ दिसत नाही. नाशिक येथील पराभवाची परतफेड करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्रिय झाल्याने पुणे शिक्षक मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
विधान परिषदेच्या 5 पैकी 4 जागांवर बंडखोरीचे महायुतीपुढे मोठे आव्हान:महाविकास आघाडीतही बंडखोरी झाल्याने लढत रंगणार