![]()
शहरातील हिवरखेडा गौताळा रस्त्यावरील मदरसा औरंगजेब आलमगीर येथील २४ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी एरंडीच्या बिया बदाम समजून खाल्ल्याने विषबाधा झाली. २४ मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ३ मुलांची प्रकृती गंभीर असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जुम्म्याची नमाज अदा केल्यानंतर मदरशातील काही मुलांनी परिसरातील एरंडीच्या झाडाच्या फळातील बिया खाल्ल्या. या बिया बदाम असाव्यात अशा गैरसमजातून मुलांनी त्या खाल्ल्याची माहिती शिक्षक महंमद अरफात यांनी दिली. काही वेळातच मुलांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. एकाच वेळी अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी ४ वाजेच्या सुमारास सर्व मुलांना रुग्णालयात दाखल केले. समीर मोहम्मद अन्सारी, अरमान शेख सलमान आणि इरफान शेख तन्वीर या ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.एरंडीच्या बियांमध्ये ‘रायसीन’ विषारी घटक एरंडीच्या बियांमध्ये रायसीन हे घातक आणि विषारी घटक असते. रायसीन हे मानवी शरीरातील पेशींची प्रथिने बनवण्याची क्षमता नष्ट करते, ज्यामुळे पेशी मृत पावू लागतात. एरंडीची बी खाल्ली गेल्यास विष शरीरात शोषले जाते.
कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Source link
एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळे 24 विद्यार्थ्यांना विषबाधा:संभाजीनगरातील कन्नडमधील मदरसा औरंगजेब आलमगीर येथील घटना