Headlines

पती-मुलीला मारण्यासाठी अघोरी विद्येचा वापर:महिलेवर अमानुष प्रथेप्रकरणी गुन्हा दाखल




पुण्यात पती आणि मुलीला वश करण्यासाठी तसेच त्यांना त्रास देण्यासाठी अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचा वापर केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड, मुंबई येथील रहिवासी असलेल्या तुलिका योगेश धुत (वय ४४) हिच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे. याप्रकरणी खराडी येथील योगेश सत्येंद्र धुत (वय ४७) यांनी आपली पत्नी तुलिका हिच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. २४ मे २०२० ते २१ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी महिलेने फिर्यादी पती आणि मुलीला घरापासून विभक्त करण्यासाठी, सासू-सासऱ्यांना त्रास देण्यासाठी तसेच पतीवर वशीकरण करण्यासाठी अघोरी संकल्प आणि जादूटोणा केल्याचा आरोप आहे. या प्रकारात पतीला एक वही सापडली होती. त्या वहीत तक्रारदार योगेश यांचे वडील आणि त्यांच्या मुलीचे नाव लिहिलेले होते. लिंबू कापून त्यावर रस टाकणे, तीन मिरच्या जाळणे, डाव्या पायाने चिरडून थुंकणे आणि वेगळे होण्याची इच्छा व्यक्त करणे अशा पद्धतीचे जादूटोणा केल्याचे त्या वहीतून समोर आले आहे. तसेच आई-वडिलांना व मुलीला मारण्यासाठी पत्नी संकल्प करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला केली मारहाण दरम्यान, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला मारहाण करून तिचा दात पाडल्याची घटना वानवडी येथील एका सोसायटीत घडली आहे. नंदुलाल प्रफुल्ल शामल (वय ३५, रा. केदारी नगर, वानवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंचला नंदुलाल शामल (वय ३२) यांनी पती नंदुलालविरुद्ध फिर्याद दिली आहे. साळुंखे विहार येथील केदारीनगरमधील माऊली सोसायटीत ही घटना घडली. नंदुलालने पत्नीकडे दारूसाठी पैसे मागितले असता, तिने नकार दिला. या रागातून त्याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या तोंडावर उजव्या बाजूला जोरदार ठोसा मारला. या मारहाणीत चंचला यांचा उजव्या बाजूचा दात तुटला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *