Headlines

नाशिकच्या रामकुंडावर दशक्रिया विधीसाठी पाणी नाही; विकतचे पाणी शिंपडण्याची वेळ:कुंभमेळ्याच्या कामासाठी पाणी रोखले, पण भाविकांच्या पाण्याची सोय नाही




नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड आणि गोदाघाटावर राज्यभरातून रोज शेकडो भाविक दशक्रिया विधी करण्यासाठी येतात. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने रामकुंड आणि गांधी तलाव पूर्णपणे कोरडे केले आहेत. यामुळे धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल होत असून, चक्क २० ते २५ रुपयांची पाण्याची बाटली विकत घेऊन अंगावर पाणी शिंपडून विधी पूर्ण करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. संपूर्ण घाट परिसर कोरडा पडल्याने स्नानासाठी पाण्याचा एक थेंबही नाही. भाविकांना शेवटी नाईलाजाने दुकानातून मिनरल वॉटर विकत घेऊन डोक्यावर आणि अंगावर शिंपडावे लागत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे. टँकरची तरी व्यवस्था करा कुंभमेळ्याच्या कामासाठी पाणी रोखले असले तरी पालिकेने भाविक व पुरोहितांसाठी पिण्याच्या पाण्याचे आणि विधीनंतर आचमन किंवा स्नानासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत.
– कैलाश गवळी, भाविक पिण्यासाठीही पाणी नाही येथे स्नानासाठीच नाही, तर साध्या पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे. पालिकेने कुंभमेळ्याची तयारी करावी, मात्र येथे येणाऱ्या भाविकांच्या गरजांचा बळी देऊन हे काम का केले जात आहे.-अधिकारी चौधरी, नागरिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *