![]()
चांदवड व येवला तालुक्यांच्या परिसरातील तळेगाव, कातरणी शिवारात सलग तीन दिवसांपासून तरस दिसत असल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सध्या शेतांमध्ये मका काढणीची कामे सुरू असून, तरसाचा दिवसा वावर आढळत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव, कातरणी परिसरातील शेतकरी विक्रम हरिभाऊ वाकचौरे यांना गेल्या तीन दिवसांपासून परिसरात तरस दिसत असल्याची माहिती आहे. दि. १६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारासही तरस दिसल्याचे सांगण्यात आले. विक्रम वाकचौरे व लालू खंडू मोरे यांच्या शेतात शेतकऱ्यांची मका काढणीची कामे सुरू आहेत. अशा वेळी तरसाचा वावर दिसत असल्याने शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Source link
तळेगाव, कातरणी शिवारात तरसाचा 3 दिवसांपासून वावर:शेतकरी भयभीत, मका काढणीची कामे सुरू असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर