Headlines

चांदवड:दरसवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दुभत्या गाईचा मृत्यू




तालुक्यातील दरसवाडी (हिरापूर) शिवारातील कांगुणे वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गोठ्यातील दुभती गाय ठार झाली. या प्रकाराने परिसरातील शेतकरी व पशुपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. हिरापूर येथील कांगुणे वस्तीवरील शेतकरी सागर कांगुणे यांच्या घराजवळ बांधलेल्या दुभत्या गाईवर रात्री तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केले. गुरुवारी (दि. १५) सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकरी कांगुणे हे गोठ्याकडे गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत या घटनेचा पंचनामा केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *