Headlines

मेट्रो कामामुळे कात्रज चौकात जड वाहनांना बंदी:स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोचे काम सुरू, वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग जाहीर केले




स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. कात्रज चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. ‘कात्रज चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. जड आणि अवजड वाहनांनी (डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रेलर, कंटेनर) कात्रज चौकातून न जाता पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. पुणे-सातारा महामार्गावर कात्रज जुन्या बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडीपासून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. सातारा रस्त्यावरुन नवीन बोगदामार्गे कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वारजे भागातून कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. सोलापूरकडून हडपसर, मंतरवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्याने कात्रजकडे येणाया जड वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. बोपदेव घाटमार्गे कात्रज-कोंढवा रस्त्याने कात्रजकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मार्केट यार्ड, गंगाधाम, बिबवेवाडीमार्गे कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. स्वारगेटकडून कात्रज चौकात जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. अवजड, जड वाहनांनी नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, सासवड, गराडे, चिंबळी, सासवड, मंतरवाडी, वडकी या मार्गाचा वापर करावा. नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, गराडे, भिवरी, बोपदेव घाट, येवलेवाडी, पिसोळी, मंतरवाडी या मार्गाचा वापर करावा. मुंबईकडून वारजेमार्गे कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. साताऱ्याहून स्वारगेटकडे येणाऱ्या एसटी बस, प्रवासी वाहनांनी नवले पूल परिसरातून उजवीकडे वळावे. कात्रज मार्गे स्वारगेटकडे जावे. कात्रज परिसरातील रहिवाशांसाठी पर्यायी मार्ग कात्रजकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज चौकातून न जाता. अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा. वंडरसिटी सोसायटी ते कात्रज बायपास चौकात दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कात्रज बायपास चौक ते मोरे बाग दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कात्रज बायपास चौक ते राजस सोसायटी, बायपास चौक ते कात्रज जुना बोगद्यापर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *