Headlines

Sushma Andhare Targets Uday Samant Over Pune Teacher Election Controversy


“पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत विसंवाद आणि कुरघोडीचे राजकारण आता चव्हाट्यावर आले आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांना स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून त्यांचा बळी दिला गेला. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ ऐ

.

सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या 5 मतदारसंघांतील घडामोडी, महायुतीमधील छुप्या बंडखोऱ्या, पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय नाट्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगावरून सुरू असलेल्या वादावर सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

पुण्यात चिवटेंचा बळी देऊन सानपांना बळ

पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या रणनीतीवर ताशेरे ओढताना सुषमा अंधारे म्हणाल्या. “भाजपने या मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी दिली. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेने सुरुवातीला अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवलेल्या मंगेश चिवटे यांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. मात्र, त्याच वेळी उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन सानप यांनी अपक्ष अर्ज भरला आणि आता शिंदे गट उघडपणे सानप यांच्या पाठीशी उभा राहत आहे. स्वतःच्या अधिकृत कार्यकर्त्याचा बळी देऊन मित्रपक्षाला शह देण्याचे हे गलिच्छ राजकारण सुरू आहे.”

उदय सामंत भाजपमध्ये जातील?

“सचिन सानप हे शिंदेंचे निष्ठावान नसून सामंतांचे हस्तक आहेत. सत्ता आणि पदासाठी कोण कधी कोणाचा घात करेल, याचा नेम नाही. उदय सामंत यांना उद्या जर भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची संधी देऊ केली, तर ते एकनाथ शिंदेंचा विचार न करता थेट तिकडे सामील होतील. त्यामुळे ते ‘एकनाथ शिंदे 2.0’ म्हणून पुढे येत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला.

पुणे शिक्षक मतदारसंघात चौरंगी सामना

पुणे विभागातील या हायव्होल्टेज निवडणुकीत राजकीय समीकरणे अत्यंत रंजक बनली आहेत. काँग्रेस तथा महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर पुन्हा एकदा मैदानात असून त्यांना शिक्षक संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनीही अपक्ष म्हणून दंड थोपटले असून, शिक्षक वर्गातील विविध आघाड्यांनी त्यांना ताकद दिल्याने त्यांचीही स्थिती भक्कम मानली जात आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विरोधात आता शिंदे गटाचा पाठिंबा लाभलेले सचिन सानप उभे ठाकल्याने महायुतीच्या मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून, याचा थेट फटका सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धर्मेंद्र प्रधानांपेक्षा ज्ञानेश कुमारांना वाचवायला अख्खी भाजप मैदानात!

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी पुकारलेल्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी उपरोधिक शब्दांत उत्तर दिले. “‘ज्ञानू का जानू कौन है इधर?’ असा सवाल उपस्थित करत अंधारे म्हणाल्या की, देशात जेव्हा नीट (NEET) किंवा इतर शिक्षण क्षेत्रातील घोटाळे गाजले, तेव्हा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या बचावासाठी जेवढी भाजप पुढे आली नव्हती, तेवढी सगळी फौज आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी मैदानात उतरली आहे. यावरून निवडणूक आयोग आणि भाजप नेत्यांचे लागेबांधे किती घट्ट आहेत, हे उघड होते.”

भाजप प्रवक्त्यांची खिल्ली

“राम सातपुते, नवनीत राणा किंवा कोकणातील ‘टिल्लू’ हे स्वतःला विद्वान समजतात. दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करताना आमच्या हातात देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा होता. आम्ही आंदोलनात राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन जायचे नाही, तर काय भाजपचे कमळ हातात घेऊन जायचे का? तिरंगा ही देशाची आणि आमची स्वाभिमानी अस्मिता आहे,” असे ठणकावून सांगत सुषमा अंधारे यांनी विरोधकांच्या देशप्रेमावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

————————————–

हेही वाचा…

नमो सन्मानचे 4,000 दिले नाहीत, दुष्काळात 5,000ची भीक कसली देता?:बारामतीतून तब्बल 7 लाख मतदार गायब कसे झाले, माझीच चौकशी करा -सुप्रिया सुळे

“राज्यातील शेतकरी आज अत्यंत भीषण दुष्काळात होरपळत असताना राज्य सरकारने जाहीर केलेली 5,000 रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. केंद्राच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये (2,000 रुपयांचे तीन हप्ते) देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेचा शेवटचा हप्ता 13 जानेवारी 2026 रोजी खात्यात जमा झाला. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात मिळायला हवे असलेले आधीचे 4,000 रुपये सरकारने अद्याप दिलेले नाहीत. आधीचे हक्काचे 4,000 रुपये बुडवायचे आणि दुष्काळात वरून 5,000 रुपये देऊन उपकार दाखवायचे, हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. तातडीने आधीचे 4,000 आणि हे 5,000 असे किमान 9,000 रुपये खात्यात जमा झाले पाहिजेत. तसेच आदरणीय शरद पवार साहेबांनी पत्रात मांडल्याप्रमाणे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांची थेट भरपाई मिळाली पाहिजे,” अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.