Headlines

गोलटगावच्या पारधी कुटुंबात सहा बालके साथीच्या आजाराने बाधित:प्रकरण अंगलट आल्यावर सर्वेक्षण सुरू‎




छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगाव येथील पारधी कुटुंबातील ६ चिमुकल्या बालकांना साथीच्या आजाराची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य विभागात गोंधळ उडाला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर खडबडून जाग आलेल्या आरोग्य प्रशासनाने अखेर शुक्रवारपासून परिसरात सर्वेक्षण सुरू केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी जाऊन आल्याचा दावा करत असले, तरी हा सर्व प्रकार म्हणजे आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार आणि अक्षम्य दुर्लक्ष झाकण्याचा प्रयत्न असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. वास्तविक, कोणत्याही परिसरात लसीकरण शंभर टक्के पूर्ण करणे आणि संसर्गजन्य आजारांना रोखणे ही प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य विभागाची मूळ जबाबदारी असते. मात्र, गोलटगावच्या येथील एका कुटुंबात राहणाऱ्या बालकांचे नियमित लसीकरण झालेच नव्हते. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून या वस्तीत स्वतःच्या प्लॉटवर पत्र्याचे शेड करून राहत आहे. एकाच १४ ते १५ जणांच्या एकत्र कुटुंबातील ६ बालकांना साथरोगाची लागण झाली आहे. वंचित व भटक्या घटकांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचण्यात अपयशी ठरल्यानेच ही वेळ आल्याचा आरोप होत आहे. वेळेवर लसीकरण आणि पालकांचे प्रबोधन झाले असते, तर अंधश्रद्धेपोटी उपचारास नकार देऊन बालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडलाच नसता. उपचाराविना बालकांना नेले गोवर हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. त्रासाने विव्हळणाऱ्या बालकांना पालकांनी करमाडच्या आरोग्य उपकेंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तातडीने भरती होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अज्ञानापोटी व अंधश्रद्धेमुळे पालकांनी भरती न करताच मुलांना उपचाराविना तिथून नेले. बाधित मुले आणि त्यांचे कुटुंब वस्तीत मोकळेपणाने वावरत असल्याने संपूर्ण परिसरावर साथीच्या रोगाचे सावट पसरले आहे. वस्तीवर सर्वेक्षण सुरू Ãरक्ताचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. सध्या ती बालके संशयित म्हणून गृहीत धरून कार्यवाही सुरू केली आहे. मुलांना रुग्णालयात भरती करून घेतले होते, मात्र पालक सुट्टी घेऊन घरी गेले. गावातील नागरिक आणि वैद्यकीय टीमला सोबत घेऊन थेट वस्तीवर पोहोचलो. मुलांना आवश्यक औषधोपचार सुरू केले आहे. — डॉ. प्रसन्ना भाले, तालुका आरोग्य अधिकारी, छत्रपती संभाजीनगर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *