Headlines

कळसूबाई मंदिराला ‘वारली’चा साज:5 दिवस मेहनतीने परिसर सजला; आदिवासी संस्कृतीचे दर्शन‎




कळसुबाई शिखरावर रंगकामासाठी आवश्यक साहित्य पोहोचवणे हे मोठे आव्हान असते. जहागीरदारवाडीचे सरपंच आणि स्थानिक तरुणांच्या सहकार्याने साबळे कुटुंब शिखरावर जाते. तेथे मुक्कामाची व्यवस्था स्थानिक हॉटेलचालकांकडून तंबू उभारून केली जाते. रमेश साबळे, पत्नी पूजा साबळे हे सलग पाच वर्षांपासून कळसूबाई मंदिरावर वारली चित्रकला साकारत आहेत. नवरात्रोत्सवाच्या चार ते पाच दिवस आधी रंगकामाला सुरुवात होते. शिखरावर एक दिवस मुक्काम करून मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. आदिवासी समाज निसर्गपूजक असल्याने यंदाच्या चित्रकलेतून जल, जंगल, जमीन आणि ग्रामीण जीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. वारली कलेच्या माध्यमातून निसर्गाशी असलेले नाते आणि आदिवासी जीवनशैलीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रतिनिधी| इगतपुरी महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर आणि आदिवासींचे कुलदैवत असलेल्या आई कळसुबाईच्या मंदिराला यंदा नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक वारली चित्रकलेचा साज चढविला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक मित्र मंडळ, जहागीरदारवाडी व बारी यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. शिलेदारांनी तब्बल ५ दिवस अथक मेहनत घेऊन संपूर्ण मंदिर परिसर वारली चित्रकलेने नटवला आहे. या चित्रकलेतून आदिवासी रु ढी, प्रथा व परंपरेचे जिवंत दर्शन घडविले आहे. { उर्वरित पान.४



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *