![]()
सप्तश्रृंगी गड परिसरात नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्ता दरम्यान एक भीषण अपघात घडला आहे. नांदुरी येथील अभोणा चौफुलीवर मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास एका भरधाव कारने बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांना आणि भाविकांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नाशिक ग्रामीण पोलिस दलातील वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 11 हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवामुळे नांदुरी गावात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेटिंग करण्यात आले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड आणि इतर कर्मचारी वाहतूक नियोजनाचे काम करत असताना, वणी बाजूकडून येणाऱ्या एका भरधाव कारने बॅरिकेट्स तोडून थेट पोलिसांना व भाविकांना चिरडले. धडक दिल्यानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. संशयित चालक मद्यधुंद असल्याचा संशय नांदुरी येथे पोहोचण्यापूर्वी या कारने इतर काही वाहनांनाही धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता का, असा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणी चालकाचा कसून शोध घेत आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू अपघातानंतर जखमींना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळातच गडाच्या पायथ्याशी अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे ही वृत्त वाचा
कोल्हापूर हादरले:गळ्यावर वार करत 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू, माणगावमधील घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. 17 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. वाचा सविस्तर
Source link