Headlines

Tiger Shroff Juhu Shooting Incident; Lawrence Bishnoi Gang Shooter Identified


माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने थेट बॉलिवूडला लक्ष्य केले आहे. रविवारी (18 ऑक्टोबर) संध्याकाळी जुहू पोलीस ठाण्य

.

या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि मुंबईच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, अमेरिकेत बसून भारतात शूटरचे नेटवर्क चालवणारा अनिल पंडित नेमका कोण, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जुहूच्या मैदानाबाहेर नेमकं काय घडलं?

रविवार, 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारे 7च्या सुमारास टायगर श्रॉफ जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथील मैदानावर नेहमीप्रमाणे फुटबॉल खेळण्यासाठी आला होता. खेळ संपल्यानंतर टायगर आपल्या चाहत्यांना हात दाखवून निरोप घेत मैदानाबाहेर उभ्या असलेल्या आपल्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसला. त्याच वेळी चाहत्यांच्या गर्दीत आधीच मिसळून उभ्या असलेल्या दोघांनी अचानक पिस्तुल बाहेर काढले आणि थेट टायगरच्या गाडीच्या दिशेने गोळीबार सुरू केला.

10 गोळ्या झाडल्या, एकाचे पिस्तुल लॉक झाले

हल्लेखोरांनी सुमारे 10 गोळ्या झाडल्या. गोळीबार सुरू असताना एका हल्लेखोराचे पिस्तुल अचानक लॉक (अडकले) झाले; मात्र दुसऱ्याने सलग गोळीबार सुरूच ठेवला. गोळीबारात टायगरला थेट गोळी लागली नसली, तरी कारच्या काचा फुटून त्याच्या छातीवर आणि हाताला जखमा झाल्या आहेत.

चालक आणि चाहता गंभीर

टायगरचा कारचालक फिरदौस गोळी लागून जखमी झाला, तर त्याचा चाहता उमेश चरण याच्या थेट छातीत गोळी घुसली. हल्ल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः कारचे स्टेअरिंग हातात घेत जखमींना तात्काळ नानावटी आणि केईएम (KEM) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

टायगरवर हल्ला करणारा अनिल पंडित नेमका कोण?

लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी परदेशात बसून भारतातील गोळीबार आणि खंडणीचे नेटवर्क सांभाळणाऱ्या अनिल पंडितची धक्कादायक गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. अनिल पंडित (वय 32) हा मूळचा हरियाणा राज्यातील पानिपत येथील एका ग्रामीण भागातील रहिवासी आहे. भारतात असताना सुरुवातीच्या काळात त्याच्यावर कोणतीही मोठी गुन्हे नोंद नव्हती.

कॅनडा व्हाया ‘डंकी रूट’ने अमेरिकेत प्रवेश

पंडित 2023 मध्ये अधिकृत पासपोर्टवरून कॅनडाला गेला. त्यानंतर 2024 मध्ये त्याने ‘डंकी रूट’च्या (बेकायदेशीर मानवी तस्करीचा मार्ग) माध्यमातून मेक्सिको सीमेवरून बेकायदेशीरपणे अमेरिकेत (कॅलिफोर्निया) प्रवेश मिळवला.

रणदीप मलिकची जागा घेतली

बिश्नोई गँगचा परदेशातील मोहरा रणदीप मलिक याच्या संपर्कात आल्यानंतर अनिल पंडित थेट बिश्नोई सिंडिकेटमध्ये सामील झाला. गेल्या 8 महिन्यांत मलिकच्या जागी अनिल पंडितने बिश्नोई टोळीचे प्रमुख सूत्र हाती घेतल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.

गायक गुरू रंधावाच्या जिमवर गोळीबार

जून 2026 मध्ये दिल्लीतील पश्चिम विहार भागातील ’24HS फिटनेस जिम’बाहेर पहाटे 4 च्या सुमारास झालेल्या गोळीबारात अनिल पंडितचे नाव पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर समोर आले होते. ही जिम गायक गुरु रंधावा यांच्या मालकीची होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या प्रकरणात अनिल पंडितच्या 4 शूटर्सना विदेशी शस्त्रांसह अटक केली होती. हे शूटर्स पंडितशी ‘सिग्नल’ ॲपद्वारे संपर्कात होते.

पुण्यातील ज्वेलरी शॉप आणि हरियाणात खंडणी

दिल्लीतील घटनेनंतर अवघ्या 15 दिवसांत पुण्यात एका मोठ्या सराफी पेढीबाहेर राजस्थानच्या शूटर्समार्फत गोळीबार घडवून आणण्यात आला होता, ज्यामध्ये अनिल पंडित आणि शुभम लोणकरचे नाव निष्पन्न झाले होते. याशिवाय हरियाणामध्ये गायक दिलेर खरकिया याच्या गाडीवर खंडणीसाठी गोळीबार करण्यामागेही पंडितचाच हात होता.

हरमन संधूची पार्श्वभूमी; अमेरिकेत ‘ऑपरेशन हार्ड बॉल’चा दणका

या हल्ल्याची जबाबदारी घेणारा दुसरा आरोपी हरमनवीर सिंग ऊर्फ हरमन संधू (टोपणनाव: हरी गौतम) हा पंजाबचा (जन्म 1994) रहिवासी आहे. हरमन संधू हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर रवींद्र सिंग धांडा आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा मानला जातो.

जून 2026 मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने संधूविरुद्ध ड्रग्ज तस्करीच्या आंतरराष्ट्रीय कटाप्रकरणी अटक वॉरंट जारी केले होते. लॉस एंजेलिसमध्ये अमेरिकन तपास यंत्रणांनी बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि रवींद्र धांडा गँगविरोधात ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ राबवून मोठी कारवाई केली होती.

हल्ल्यामागील कारण- सलमान खानसोबत काम करू नकोस!

कथित ऑडिओ क्लिपमध्ये अनिल पंडितने स्पष्ट केले आहे की, टायगर श्रॉफला यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खानसोबत कोणतेही व्यावसायिक किंवा चित्रपटाचे काम न करण्याची कडक ताकीद देण्यात आली होती. मात्र, टायगरने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला घडवून आणल्याचा दावा टोळीने केला आहे.

मुंबई पोलिसांची 15 पथके तपासासाठी रवाना; एका संशयिताला बेड्या

घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी तात्काळ संपूर्ण शहरात नाकाबंदी केली. जुहू पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून जिवंत काडतुसांच्या रिकाम्या 7 पुंगळ्या (Shells) जप्त केल्या असून त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. हल्लेखोरांनी वापरलेली शस्त्रे विदेशी बनावटीची असल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हल्लेखोर गोळीबारानंतर एका दुचाकीवरून अंधेरीच्या दिशेने पसार झाल्याचे दिसून आले आहे. हल्ल्यापूर्वी त्यांनी परिसरात रेकी केल्याचेही निष्पन्न झाले आहे.

15 तपास पथके तैनात

मुंबई गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची मिळून 15 पथके तयार करण्यात आली आहेत. कुर्ला, वांद्रे, कल्याण आणि दादर रेल्वे स्थानक परिसरात पथके रवाना करण्यात आली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. जुहू पोलीस ठाण्यात टायगर श्रॉफच्या चालकाच्या जबाबावरून हत्येचा प्रयत्न, आर्म्स ॲक्ट आणि संघटित गुन्हेगारी कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मुंबई पोलीस या संपूर्ण आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा छडा लावण्यासाठी कसून तपास करत आहेत.

टायगर श्रॉफवरील गोळीबाराचे 4 VIDEO

1. टायगरची कार जुहूच्या पुष्पा पार्कमध्ये पोहोचली

रविवारी संध्याकाळी 7 वाजता टायगरची कार जुहूच्या पुष्पा पार्कमध्ये पोहोचली. कारमध्ये टायगर पुढच्या सीटवर बसला होता. ड्रायव्हर गाडी चालवत होता. त्याच वेळी तिथे शूटर्सनी गोळीबार सुरू केला.

2. टायगरच्या कारवर 5 राउंड गोळीबार

शूटर्सनी टायगर श्रॉफच्या कारला लक्ष्य करून 5 राऊंड गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

3. ड्रायव्हरला गोळी लागली, तो गाडीबाहेर आला

गोळीबारादरम्यान टायगरचा ड्रायव्हर गोळी लागल्याने जखमी झाला. त्यानंतर तो गाडीतून बाहेर आला. ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर गाडी चालवण्याची जबाबदारी टायगरने स्वतः सांभाळली.

४. फ्रंट सीटवरून ड्रायव्हिंग सीटवर आला टायगर

ड्रायव्हर गाडीतून बाहेर पडल्यानंतर टायगर श्रॉफ फ्रंट सीटवरून ड्रायव्हिंग सीटवर आला. त्याने स्वतः गाडीचे स्टिअरिंग हातात घेतले आणि कार घेऊन तिथून निघून गेला.

———————————————————————-

हेही वाचा…

टायगर श्रॉफवर गोळीबार, हातावर-छातीवर पट्ट्या:एकनाथ शिंदेंनी घेतली भेट; आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले

मुंबईच्या जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफचे फोटो समोर आले आहेत. त्याच्या हातावर आणि छातीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री उशिरा त्याच्या घरी भेट दिली. त्यांनी सांगितले की, बंदुकीच्या दारूगोळ्यामुळे आणि काचेच्या तुकड्यांमुळे टायगरच्या हाताला दुखापत झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.