![]()
भोंदूबाबा अशोक खरात (६७) याला रविवारपर्यंत (२६ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी त्याला ऑनलाइन हजर करण्यात आले होते. दरम्यान, सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या राइट हँड ललित पोफळे यालाच खरातने तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खरातविरोधातील दाखल झालेला हा १९ वा गुन्हा आहे. गुंगीकारक औषधाचे रहस्य सरकारी वकील ॲड. किरण बेंडभर व ॲड. शैलेश बागडे : “पांढऱ्या डब्यात गूढ पावडर, छाप्यात चूर्णाचे डबे आढळले. ते कशासाठी वापरले जायचे? अघोरी विधीकरिता ६५२ रुद्राक्ष, ५८ चिंचोके आणि काड्या मिळून आल्या. या वस्तूंचा वापर तो भय निर्माण करण्यासाठी करत होता. रासायनिक पदार्थ कोठून आणले, पीडित महिलेला जाळ्यात कसे ओढले, यावर तो मौन बाळगून आहे. तपासात सहकार्य करत नाही. ‘मी माझ्या दैवी शक्तीने तुझ्या वडिलांना ठार मारीन आणि आयुष्य उद्ध्वस्त करीन’ अशी धमकी देत तो आई-वडिलांना बाहेर थांबवून तरुणींवर अत्याचार करत होता. खरातचे वकील ॲड. सचिन भाटे “सर्व गुन्ह्यांचे स्वरूप एकच आहे. एक महिन्यापासून आरोपी पोलिस कोठडीत आहे. तपासी पथक न्यायालयाची दिशाभूल करत आहे. तपास पूर्ण झाला असताना पुन्हा कोठडी मागणे सयुक्तिक नाही’ पीडितेवर अत्याचार करण्यापूर्वी तिला पाण्यातून गुंगी येतील असे पदार्थ दिले जात होते आणि या औषधांचा पुरवठा त्याला कुठून व्हायचा, या तांत्रिक मुद्द्यावर खरात अजूनही मौन बाळगून आहे. तो स्मृतिभ्रंशाचे नाटक करत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. पीडित महिलेवर जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात पाच महिने अत्याचार झाला, याकडे कोर्टाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर खरातला २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Source link
आधी दैवी शक्तीचा बागुलबुवा:आता स्मृतिभ्रंशाचे करतोय नाटक, भोंदू खरातविरोधात 19 वा गुन्हा दाखल