![]()
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नवरात्रोत्सवात रविवारी सहाव्या पुष्पात महालक्ष्मी इव्हेंट्स प्रस्तुत गान रसमंजरी संगीत संध्या बिग बॉस विनर, झी कन्नड सारेगमप विजेते संजय लमाणी, झी कन्नड सारेगम विजेत्या प्रगती बडीगेर, पार्श्वगायक अनन्या प्रकाश यांच्या कन्नड जुन्या व नवीन गाण्यांच्या गायन कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. ऋतिका बिराजदार या चारवर्षीय मुलीच्या भरतनाट्यम या नृत्यकलेने केले. ऋतिका ही अक्कलकोटची नात आहे. सदर कार्यक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था आणि समस्त हिरकणी सखी महिला यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदरचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संचलित अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी येथे संपन्न झाला. सहाव्या पुष्पाचे दीपप्रज्वलन नगरसेविका सुनंदा स्वामी, समाजसेविका मल्लमा पसारे, सुवर्णा साखरे, सुनंदा अष्टगी यांच्या हस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, महानंदा स्वामी, दर्शना लेंगडे-खोबरे, तेजस्विनीराजे भोसले, स्वामिनीराजे भोसले, सरोजिनी मोरे, संगीता राठोड आदी उपस्थित होते. या वेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्यासह या कार्यक्रमास समस्त विश्वस्त मंडळ आदी उपस्थित होते. प्रतिनिधी । अक्कलकोट येथील सी. बी. खेडगी महाविद्यालय, मातोश्री नीलव्वाबाई खेडगी प्रशाला आणि खेडगी इंटरनॅशनल स्कूल यांच्या विद्यमाने नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला सांस्कृतिक आणि कलात्मकतेची जोड देण्यासाठी आयोजित गरबा व दांडिया स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. अक्कलकोटमध्ये प्रथमच आयोजित या उपक्रमात विविध गीतांच्या तालावर ठेका धरत शेकडो महिला व विद्यार्थिनींनी नृत्यकौशल्याचे शानदार सादरीकरण केले. या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन संस्थेच्या उपाध्यक्षा भारती खेडगी यांच्या हस्ते झाले. माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर गंगासागर खेडगी, निर्मला स्वामी, भारती भरमशेट्टी, रेणुका धबाले, संचालिका ज्योती धरणे, मुख्य संयोजिका पवित्राताई खेडगी, गायत्री राठी, मयुरी पुरोहित, उपप्राचार्या वैदेही वैद्य आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पूनम राठी, अबोली मेहता, वैशाली पटेल, सोनू वाघमोडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. वर्षाराणी हत्ताळी व समन्वयक डॉ. लता हिंडोळे यांनी केले. प्रा. विजया कोन्हाळी यांनी आभार मानले. विविध प्रकार आणि गटात झाली गरबा स्पर्धा स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या गरबा-दांडिया सादरीकरणात ‘बेस्ट गरबा’, ‘बेस्ट दांडिया’, ‘बेस्ट मेकअप’, ‘बेस्ट कॉस्च्युम’ तसेच ‘बेस्ट मदर अँड डॉटर दांडिया’ अशा गटांत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. आकर्षक वेशभूषा, नृत्याची लयबद्धता आणि सादरीकरणामुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली. विजेत्यांचे यादी वाचन डॉ. लक्ष्मी रेड्डी व प्रा. पल्लवी कलशेट्टी यांनी केले.
Source link
अक्कलकोटमध्ये गरबा-दांडियावरधरला विद्यार्थिनी अन् महिलांनी फेर:अक्कलकोटमध्ये खेडगी शिक्षण संकुलात विविध गटांत स्पर्धा उत्साहात