राष्ट्रसंत भगवान बाबांची पावन जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचा पारंपरिक दसरा मेळावा आज अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वि
.
खुर्च्यांची सोय नसतानाही लोक स्वतःची शिदोरी बांधून येतात
मेळाव्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे अत्यंत भावुक झाल्या. “डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या या गडावर दरवर्षी लाखो भाविक स्वतःच्या घरची दशमी-भाकरी बांधून येतात. तिथे कोणाला बसायला खुर्चीही नसते, तरीही उन्हातान्हात लोक उभे राहतात. हा मेळावा माझा नसून जनतेचा आहे. भगवान बाबांचा आशीर्वाद आणि जनतेचे अफाट प्रेम हीच माझी खरी शक्ती आहे. मी भाषणात काय बोलणार हे आधी ठरवत नाही; गडावर पाय ठेवताच देवीची कृपा आणि लोकांच्या डोळ्यांतील प्रेमातून मला शब्द स्फुरतात.”
कन्यापूजनाने गहिवरले मन
“गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांची समाधी, तुळजाभवानी, रेणुकामाता आणि महालक्ष्मीचे मंदिर आहे. आज सकाळी मी कन्यापूजन केले. लहान मुलींनी ज्या निष्पाप आवाजात देवीची स्तोत्रे म्हटली, त्याने मला गहिवरून आले. ज्या दैवी शक्तीने जगाचे रक्षण केले, आज कलियुगात त्या स्त्रीशक्तीलाच वाचवण्याची वेळ आली आहे, ही खंत वाटते.”
5,000 रुपयांची रक्कम अंतिम नाही; ती दिवाळी गोड करण्यासाठी
शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या 5,000 रुपयांच्या मदतीवरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. “ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना दिवाळीत भाऊबीज म्हणून एक प्रतीकात्मक रक्कम दिली जाते जेणेकरून त्यांची दिवाळी गोड व्हावी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात हा तात्काळ दिलासा देण्यात आला आहे. ही काही अंतिम मदत नाही. या ५,००० रुपयांसोबतच पीक नुकसानीची भरपाई, केंद्र व राज्य शासनाचे स्वतंत्र अनुदान, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी या सर्व सवलती शेतकऱ्यांना मिळणार आहेत.”
सावरगाव घाटात चोख व्यवस्था; 3 हेलिपॅड्स आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त
लाखोंचा जनसमुदाय सावरगाव घाटात दाखल होत असल्याने प्रशासनाच्या वतीने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. व्हीआयपी नेतेमंडळींसाठी परिसरात ३ स्वतंत्र हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. गडावरील भगवानबाबांच्या भव्य मूर्तीचे विधिवत पूजन आणि आरती झाल्यानंतर पंकजा मुंडे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
बीड जिल्ह्यात 3 गडांवर दसरा मेळाव्यांचा धुरळा
गेल्या 3 ते 4 वर्षांत बीड जिल्ह्याची सामाजिक वीण विस्कटण्याचे अनेक प्रयत्न झाले असताना यंदा बीडमध्ये 3 महत्त्वाच्या गडांवर दसरा मेळावे होत आहेत.
- भगवान भक्तीगड (सावरगाव घाट): मंत्री पंकजा मुंडे यांचा बहुजन व वंचितांचा मेळावा.
- श्री क्षेत्र नारायणगड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा.
- श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड (आष्टी): भाजप आमदार सुरेश धस यांचा पारंपरिक दसरा मेळावा.
दुष्काळाच्या गडद छायेत आज बीड विचारांचे सोने लुटणार की आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय फैरी झडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
————————————–
हेही वाचा…
नारायणगडावर आज मनोज जरांगे पाटलांचा भव्य दसरा मेळावा: शेकडो एकरवर जय्यत तयारी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील यांचा पारंपरिक दसरा मेळावा आज (मंगळवार, दि. 20) बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर शेकडो एकर विस्तीर्ण परिसरात प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत पार पडत आहे. आज सकाळी ठीक 10 वाजता मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून नारायणगडाच्या दिशेने प्रस्थान करणार असून, सकाळी 11 वाजता ते गडावर दाखल होऊन उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करतील. राज्यातील भीषण दुष्काळ, हतबल झालेला बळीराजा आणि राज्य सरकारने जाहीर केलेली अवघ्या 5,000 रुपयांची तुटपुंजी मदत या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज नारायणगडाच्या पवित्र व्यासपीठावरून कोणती निर्णायक भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी