![]()
विजयादशमीनिमित्त बाजार झेंडूच्या फुलांनी सजला आहे. विजयादशमीला घराच्या प्रवेशद्वारावर, देवघरात तसेच दुकानांच्या दर्शनी भागात झेंडूच्या फुलांची तोरणे आणि माळा लावण्याची परंपरा आहे. फुलांच्या सजावटीमुळे परिसराला उत्सवी आणि मंगलमय स्वरूप प्राप्त होते. व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही पूजेसह सजावटीची तयारी सुरू आहे. विजयादशमीसाठी माळा तयार करणे, फुले निवडणे आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सजावटीचे साहित्य उपलब्ध करून देणे, यासाठी फुलविक्रेत्यांची धावपळ सुरू आहे. दसऱ्याच्या खरेदीमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी संध्याकाळी फुलांचा दर २० ते २५ किलो दर होता. गांधी रोड, टॉवर चौक, जयहिंद चौक, गोरक्षण रोडवर फुलांची विक्री झाली. (छाया : थ्री डिकेड्स प्रॉडक्शन, अकोला) फुलांचे धार्मिक महत्त्व हिंदू परंपरेत झेंडूची फुले शुभत्व, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक मानली जातात. देवी-देवतांच्या पूजेत, आरतीत आणि धार्मिक विधींमध्ये फुलांना विशेष स्थान आहे. दसऱ्याला शस्त्रपूजन, वाहनपूजन आणि सीमोल्लंघनाच्या विधींमध्येही फुलांचा वापर केला जातो. सांस्कृतिक परंपरा फुलांचा सुगंध, रंग आणि ताजेपणा भक्तिभाव वाढवतात, अशी श्रद्धा आहे. विजयादशमी हा सत्याचा असत्यावर आणि सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय दर्शवणारा सण असल्याने घराघरांत फुलांच्या सजावटीतून आनंद, सकारात्मकता आणि शुभेच्छांचे वातावरण निर्माण केले जाते.
Source link
विजयादशमीचा उत्साह; झेंडूच्या फुलांनी सजली बाजारपेठ