![]()
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारे संचालित श्री गाडगेबाबा प्राथमिक शाळेत नुकताच ‘समतेचा गरबा’ हा सांस्कृतिक उपक्रम उत्साहात झाला. शाळेतील शिक्षिका आणि माता-पालक यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक गरब्याच्या माध्यमातून समता, बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला. प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या आशा फुसे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्हा विविध उपक्रम कार्यवाह आशिष देशमुख, प्रफुल्ल मंदा श्रीधर जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती, विजय डवरे जिल्हा प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती तसेच प्रतिभा खापरे जिल्हा समन्वयक, महिला राजसत्ता आंदोलन, अमरावती यांची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने माता-पालक उपस्थित होते. या सांस्कृतिक उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ मनोरंजनाला प्राधान्य न देता पारंपरिक गरब्याच्या माध्यमातून समता, बंधूभाव, सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला. आजच्या बदलत्या सामाजिक पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर बालवयातच समतेचे आणि सामाजिक ऐक्याचे संस्कार घडणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब केंद्रस्थानी ठेवून शाळेच्या वतीने हा आगळावेगळा उपक्रम आखण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या आशा फुसे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी बालमनावर समतेचे संस्कार रुजवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्हा विविध उपक्रम कार्यवाह आशिष देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर आणि जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे यांनीही या उपक्रमाला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतानाच सांस्कृतिक सणांमधून सामाजिक मूल्यांचा प्रचार-प्रसार कसा करता येतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा ‘समतेचा गरबा’ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासोबतच महिला राजसत्ता आंदोलन, अमरावती येथील जिल्हा समन्वयक प्रतिभा खापरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी महिला सबलीकरण, माता-पालकांचा शिक्षण प्रक्रियेतील सहभाग आणि सामाजिक समता या विषयांवर प्रकाश टाकला. सांस्कृतिक परंपरा कायम ‘समतेचा गरबा’ ही संकल्पना केवळ सांस्कृतिक मनोरंजनापुरती मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारी ठरली. जात, धर्म, पंथ किंवा सामाजिक स्तर यांतील भेद बाजूला ठेवून परस्परांविषयी आदर, बंधुभाव आणि समानतेची भावना जोपासण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. एकत्रितपणे गरब्यात सहभाग घेतल्यामुळे शाळेतील सामूहिकता आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.
Source link
श्री गाडगेबाबा शाळेत ‘समतेचा गरबा’:विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी; बंधुभाव, सामाजिक बांधिलकीचा जागर